"अरे हा तर राजपाल यादव!" गौरव मोरेला 'छोटे पंडित'च्या लूकमध्ये पाहून नेटकरी सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 17:35 IST2024-05-04T17:34:34+5:302024-05-04T17:35:17+5:30
'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे' या कॉमेडी शोमधून गौरव प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहे. आता गौरव या शोमध्ये छोटे पंडितची भूमिका साकारताना दिसणार आहे.

"अरे हा तर राजपाल यादव!" गौरव मोरेला 'छोटे पंडित'च्या लूकमध्ये पाहून नेटकरी सुसाट
फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. अनेक कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना हसवणाऱ्या गौरवला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सिनेमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेतून प्रसिद्धी मिळवल्यानंतर गौरवचं नशीबच उजळलं. अनेक मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना तो दिसला. आता त्याची हिंदी कॉमेडी शोमध्ये एन्ट्री झाली आहे.
सोनी टीव्हीवरच्या 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे' या कॉमेडी शोमधून गौरव प्रेक्षकांना खळखळवून हसवत आहे. आता गौरव या शोमध्ये छोटे पंडितची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा BTS व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गौरवने भुलभुलैय्या सिनेमातील छोटे पंडितसारखा लूक केल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. गौरवला छोटे पंडित साकारताना बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
"एन्ट्रीला आधी राजपाल यादव आहे असंच वाटलं", "वाह वाह", "असंच काम करत राहा गौऱ्या", "मला वाटलं राजपाल यादवच आहे", अशा कमेंट गौरवच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. गौरव 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसायेंगे' या शोमधूनच प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे.