रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:47 PM2024-05-14T14:47:33+5:302024-05-14T14:48:19+5:30

Gaurav more: या ट्रोलरने गौरवला फिल्टरपाड्याचा गुंड असंही म्हटलं आहे. ज्यावर गौरवने संतापाच्या भरात ट्रोलरला चांगलंच सुनावलं.

maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-troll on social media actor answer-to-trollers | रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (GAURAV MORE). विनोदाचं अचूक टायमिंग आणि स्वभावातील साधेपणा यांच्या जोरावर गौरव अल्पावधीत लोकप्रिय झाला. आज प्रत्येक प्रेक्षक त्याला त्यांच्या कुटुंबातील एक भाग समजतात. अलिकडेच गौरवने हास्यजत्रेला रामराम करत मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री केली. मात्र, यात कार्यक्रमात एक स्कीट सादर केल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल केलं. अगदी राणू मंडलसोबत त्याची तुलना केली. या ट्रोलर्सला आता त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीने गौरव, कुश बद्रिके आणि हेमांगी कवी या तिघांच्या स्कीटचा एक व्हिडीओ शेअर केला हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी गौरवला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी तर त्याला राणू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड अशा शब्दांत हिनवलं आहे. या ट्रोलर्सला आता त्याने त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

गौरवने दिलं सडेतोड उत्तर

गौरवचा हा व्हिडीओ पाहिल्यावर लोकांनी त्याच्यावर टीकास्त्र डागलं. त्याच्या दिसण्यावरुनही त्याला लोकांनी ट्रोल केलं. “रानू मंडल झालाय बिचारा गौरव, फेम मिळालं आणि स्वतःला महान समजायला लागला. त्याला वाटलं ऑनलाइन फॅन्स त्याचे चित्रपट बघतील, शोचा टीआरपी वाढवतील पण प्रत्यक्षात वेगळंच होताना दिसतंय आणि पुढे पण दिसत राहणार. एका पॉइंटला सगळं हातातून जाणार… चांगला अभिनेता होता म्हणून काय ते वाईट वाटतं असे थुक्रट विनोद मारताना बघून, भोजनेचं पण तसंच झालं. नशिबात जे लिहिलंय ते होणारच,”  असं एका नेटकऱ्याने म्हणत त्याला ट्रोल केलं. 

त्यावर “आधी स्वतःच्या अकाउंटवरून बोला, मग आमच्याबद्दल बोला, बाकी गरमी एन्जॉय करा,” असा रिप्लाय गौरवने दिला. गौरवच्या या रिप्लायवरही ट्रोलरने पुन्हा एक कमेंट केली.  “अरे लेका कोणाच्या बाजूने बोलतोयस तू नक्की? माझ्या की महाराज गौरवादित्य? मराठी चांगलं माझं आहे म्हणणं आणि तू स्वतःचं बोलतोयस हिंदीत. मग मी जज करणारच ना. जर हा मराठीपेक्षा हिंदीला महत्त्व देत असेल तर बच्ची बच्ची वाला फिल्टरपाड्याचा गुंड,” अशी कमेंट या ट्रोलरने पुन्हा केली. ज्यामुळे गौरव संतापला.

फिल्टरपाड्याचा गुंड म्हटल्यावर संतापला गौरव

“अहो फुकट कमेंट आहे म्हणून काहीही बोलायचं नसतं. घरी पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर असंच बोलता का? स्वतःचा फोटो ठेवायला हिंमत लागते जी आपल्यात नाहीये. राहिला प्रश्न गुंडाचा तर कधी वेळ मिळाला तर चकर मारा फिल्टरपाड्याला मग सगळे समज-गैरसमज दूर होतील आणि हो स्वतःचा फोटो लावून बड्या बड्या बाता मारा कळलं का?” , असं उत्तर गौरवने दिलं.

गौरवने रिप्लाय दिल्यानंतर संबंधित ट्रोलरने त्याच्या रंगरुपावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली. “मुळात तुमच्या सारखा दिसणारा व्यक्ती एवढा का मागे आहे कळतं नाही चेहरा बघण्याच्या? हिंमत का लागते स्वतःचा फोटो ठेवायला ? काही लोकांना नाही आवडत स्वतःचे फोटो लावायला, त्यात अगदी हिंमत नाही वगैरे असा बालिश विचार मी तरी नाही केला अजून आणि फिल्टरपाडा अस्वच्छ एरिया आहे. सॉरी मला अ‍ॅलर्जी होईल. पण मी मान्य करतो तू तिथला हिरो असशील नो डाउट.”

यावर गौरव म्हणाला, “हिंमत पाहिजे नाहीतर अशाना समाजात काय बोलतात माहितीयेना. अहो, चेहरा बघितल्यानंतर कळतं ना हा हिंमत आहे म्हणून आणि कोण आहे हा जो एवढा बोलतो मला, ज्याला मी इकडे आमंत्रण सुद्धा दिलं नाही. चला पाटील कोण आहे हे कळू द्या लोकांना या समोर आणि एरिया कसा आहे, तो माझा आहे, माझी भूमी आहे. तुमच्यासारखा लपून नाही बोलतो जे आहे ते समोर आहे. डिपी ठेवा,” असं सडेतोड उत्तर गौरवने दिलं.

 दरम्यान, गौरव लवकरच 'अल्याड पल्याड' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १४ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून त्याच्यासोबत मकरंद देशपांडे आणि सक्षम कुलकर्णी झळकणार आहेत.

Web Title: maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-troll on social media actor answer-to-trollers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.