"आजपासूनचे पुढील सगळे दिवस...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रताच्या वाढदिवशी नवऱ्याची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 09:27 AM2024-08-29T09:27:53+5:302024-08-29T09:28:25+5:30

Namrata Sambherao Birthday : उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसवणाऱ्या नम्रताचा आज वाढदिवस आहे. नम्रताच्या वाढदिवशी तिच्या पतीने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao birthday husband yogesh sambherao shared special post | "आजपासूनचे पुढील सगळे दिवस...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रताच्या वाढदिवशी नवऱ्याची खास पोस्ट

"आजपासूनचे पुढील सगळे दिवस...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रताच्या वाढदिवशी नवऱ्याची खास पोस्ट

नम्रता संभेराव ही मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि कॉमेडी शोमध्ये काम केलेल्या नम्रताला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिने साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसवणाऱ्या नम्रताचा आज वाढदिवस आहे. नम्रताच्या वाढदिवशी तिच्या पतीने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

नम्रताचा पती योगेश संभेरावने अभिनेत्रीचा फोटो शेअर करत तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत. "नमा, तू नेहमी प्रमानेच सदैव हस्यमय राहो, तुझी सगळी स्वप्न सत्यात उतरू दे, तुझ्या सुख दु:खात मी तुझ्या सोबत आहे, आजपासून पुढील सगळे दिवस खूप यशाचे जाओ, माझा चेहरा पाहून माझ्या मनातले अचूक ओळखणाऱ्या माझ्या प्रिय बायको नम्रता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...", असं योगशने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टवर नम्रताने कमेंट करत "लव्ह यू थँक्यू सो मच नवरा...", असं म्हटलं आहे. 


नम्रताला चाहत्यांनीही कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, नम्रताने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. काहीच महिन्यांपूर्वी तिचा नाच गं घुमा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. नाच गं घुमा सिनेमातील नम्रताच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. सध्या ती हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao birthday husband yogesh sambherao shared special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.