'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 03:51 PM2024-06-16T15:51:23+5:302024-06-16T15:51:51+5:30

हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने फादर्स डे निमित्त लिहिलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय (namrata sambherao, maharashtrachi hasyajatra)

maharashtrachi hasyajatra fame Namrata sambherao emotional post on Father's Day | 'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट

'आयुष्यातला सगळ्यात मोठा हट्ट तुम्ही..'; नम्रताची 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी भावूक पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव ही सर्वांची लाडकी अभिनेत्री.  नम्रताने आजवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून खळखळून हसवलं आहेच. याशिवाय सिनेमांच्या माध्यमांतूनही तिने अभिनयाची छाप सोडली आहे. नम्रताने यावर्षी मुक्ता बर्वेसोबत 'नाच गं घुमा' सिनेमात अभिनय करुन सर्वांकडून कौतुक मिळवलं. अशातच आज 'फादर्ड डे' निमित्त नम्रताने तिच्या बाबांसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे.

नम्रताची फादर्स डे निमित्त खास पोस्ट 

नम्रताने सोशल मीडियावर बाबांचा फोटो शेअर केलाय. या फोटोखाली नम्रताने सुंदर कॅप्शन लिहिलंय. नम्रता लिहिते, 'Happy Father’s Day. कायम ऐकत आलात माझं एकच हट्ट केला तोही पुरवला आयुष्यातला माझा सगळ्यात मोठा हट्ट माझं passion अभिनय, त्यात तुम्ही साथ दिलीत, तुम्ही त्यावेळी दिलेल्या परवानगीच मी वारंवार सोनं करणार तसा प्रयत्न तरी नक्कीच करणार. मला जेव्हा म्हणता ना हे बघ नमू माझी कॉलर tight झाली खूप भारी वाटतं मला असेच खुश रहा हसत रहा. Thank u so much' नम्रताच्या या पोस्टवर अनेकांनी छान कमेंट करत तिचं आणि तिच्या वडिलांचं कौतुक केलंय.

 नम्रताचं वर्कफ्रंट

नम्रता संभेरावच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये अभिनय करत आहे. या शोमध्ये नम्रता साकारत असलेले लॉली, पावली अवली कोहली असे विविध कॅरेक्टर्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. नम्रता आणि मुक्ता बर्वे या जोडीचा 'नाच गं घुमा' सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.  नम्रताने सिनेमात साकारलेल्या आशाताईंच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. नम्रता लवकरच 'वाळवी २' मध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame Namrata sambherao emotional post on Father's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.