सोन्याचे दागिने, हिरव्या बांगड्या, मुंडावळ्या बांधलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:45 AM2023-10-06T11:45:12+5:302023-10-06T11:46:03+5:30
तिच्या चेहऱ्यावर अगदी नव्या नवरीसारखंच हसू आहे.
आजच्या सोशल मीडियाच्या काळात सेलिब्रिटींचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. कलाकार त्यांच्या प्रोजेक्टसाठी वेगवेगळे लुक करतात. अनेकदा अशा लुकमध्ये त्यांना ओळखणंही कठीण होतं. नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने नवरीचा गेटअप केला आहे. सोन्याचे दागिने, नाकात नथ, हिरव्या बांगड्या, कपाळी चंद्रकोर आणि मुंडावळ्या बांधून ही अभिनेत्री तयार झाली आहे. ओळखलंत का ?
नव्या नवरीच्या वेषात अभिनेत्रीने फोटो पोस्ट केला आहे. निळ्या रंगाच्या साडीत तिने अर्धाच फोटो पोस्ट केलाय. हातात पाटल्या, हिरव्या बांगड्या आहेत. गळ्यात जड दागिने, केसात गुलाबाची फुलं आणि कपाळी चंद्रकोर अशा लुकमध्ये अभिनेत्री लाजताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर अगदी नव्या नवरीसारखंच हसू आहे. पण हा अभिनेत्रीचा लग्नातला फोटो नाही तर तिने शूटनिमित्त केलेला लुक आहे.
ही अभिनेत्री आहे सर्वांची लाडकी लॉली म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao). महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नम्रताने हा फोटो पोस्ट केलाय. एका स्किटसाठी तिने हा लूक केल्याचं दिसतंय. 'सुरखी' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. सुरखी हे तिच्या कॅरेक्टरचं नाव आहे.
नम्रता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. कधी ती गाणी गातानाचे व्हिडिओ पोस्ट करते तर कधी तिच्या चिमुकल्या मुलाची बडबड रेकॉर्ड करते. हास्यजत्रेतील तिच्या 'लॉली'ला कॅरेक्टरला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.