नम्रताने 'तो' व्हिडीओ शेअर केल्यामुळे भडकला प्रसाद खांडेकर; म्हणाला, 'इसका करारा जवाब मिलेगा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 14:19 IST2024-04-23T14:17:23+5:302024-04-23T14:19:50+5:30
Prasad khandekar: नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत प्रसादची माफीही मागितली आहे. मात्र, तरीदेखील त्याने नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येत आहे.

नम्रताने 'तो' व्हिडीओ शेअर केल्यामुळे भडकला प्रसाद खांडेकर; म्हणाला, 'इसका करारा जवाब मिलेगा'
प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारा रिअॅलिटी शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांना आपलासा वाटतो. त्यामुळे त्याच्याविषयी नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. या कार्यक्रमातील कलाकारही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते कायम सोशल मीडियावर एकमेकांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतात. यात अभिनेत्री नम्रता संभेराव (namrata sambherai) हिने प्रसाद खांडकेरविषयी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे तो तिच्यावर चिडला आहे.
काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा झाला. या दौऱ्यातील एक मजेशीर व्हिडीओ नम्रताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच त्याला एक मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. हा व्हिडीओ आणि कॅप्शन पाहून प्रसाद खांडेकर (Prasad khandekar) यानेही नम्रताला तिच्याच शब्दांत उत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या नम्रताने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत येत आहे.
नम्रताने इन्स्टाग्रामवर प्रसादचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद बसल्याजागी झोपल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत नम्रताने “सॉरी, कँट्रोल नाही झालं पश्या. हा ऑडिओ खूप ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी ही पोस्ट करतेय. (btw हा व्हिडिओ jet lag मधला होता. आम्ही ऑस्ट्रेलियात होतो, तेव्हाचा आहे ) बाकी पश्याला आळस येत नाही, तो खूप उत्साही आहे. माझं काही खरं नाही,” असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून प्रसादलाही लटका राग भरला आणि त्यानेही मस्करीच्या अंदाजात रिप्लाय दिला. “रुको नम्रता. इसका करारा जवाब मिलेगा…सबका बदला लैगा रे पश्या,” अशी कमेंट त्याने या व्हिडीओवर केली आहे.