'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने 'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या दर्शनाला, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 15:41 IST2023-09-20T15:40:30+5:302023-09-20T15:41:31+5:30
ओंकार भोजनेने नुकतंच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं. चिंतामणीच्या चरणी ओंकार नतमस्तक झालेला पाहायला मिळाला.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने 'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या दर्शनाला, पाहा फोटो
उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लाडक्या शोमधून ओंकार घराघरात पोहोचला. हास्यजत्रेतून विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. हास्यजत्रेतील ओंकारच्या स्कीटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
ओंकार भोजनेचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. सध्या सर्वत्रच गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटीही प्रसिद्ध अशा गणपती मंडळांना भेट देऊन गणरायाचं दर्शन घेत आहेत. ओंकार भोजनेने नुकतंच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं. चिंतामणीच्या चरणी ओंकार नतमस्तक झालेला पाहायला मिळाला.
'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "सनी देओलसारखे कलाकार..."
चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन ओंकार भोजनेचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, ओंकारने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. 'बॉईज २', 'सरला एक कोटी' या चित्रपटांत तो झळकला. आता 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.