“दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला...”, ओंकार राऊतसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:58 PM2023-08-09T16:58:32+5:302023-08-09T16:59:02+5:30
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतचा आज वाढदिवस आहे. समीर चौघुलेंनी ओंकारच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लाडका शो आहे. महाराष्ट्राच्या घराघरात या शोचे चाहते आहेत. हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच त्यातील कलाकारांच्या करिअरमध्येही हास्यजत्रेचा मोठा वाटा आहे. अनेक विनोदवीरांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेता ओंकार राऊतही त्यापैकीच एक आहे. कॉलेज जीवनापासून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या ओंकारने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. पण, हास्यजत्रेमुळे त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली. अफलातून विनोदी बुद्धीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या ओंकारचा आज वाढदिवस आहे.
ओंकारच्या वाढदिवसानिमित्त विनोदाचा बादशहा समीर चौघुलेंनी खास पोस्ट लिहिली आहे. चौघुलेंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन ओंकारबरोबरचा फोटो शेअर केला आहे. “वाढदिवसाच्या फुल्टू शुभेच्छा...गेल्या वर्षी तुझ्या वाढदिवसा निमित्ताने काही कारणास्तव पोस्ट टाकली नाही. तुला कारण माहितीये...पण, या वर्षी मी ही संधी गमावणार नाही...ओंकार, ओंकी , राजदीप, ओम...साधारणतः दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला रंगकर्मी, रुपारेल महाविद्यालयात एकांकिका क्षेत्रातील मोठं नाव, नाटकावर मनापासून प्रेम करणारा असल्याने एखाद दोन प्रहसनातच तो हास्यजत्रेत रुळला. कारण, आमच्या ओंक्याची ग्रासपिंग करण्याची क्षमता अफाट आहे आणि सगळ्यात महत्वाचं "शिकण्याची आणि इतरांनी केलेल्या सूचना, लक्षात आणून दिलेल्या चुका प्रांजळपणे स्वीकारण्याची वृत्ती आहे. प्रत्येक स्किटनंतर पाटी कोरी करून गोस्वामी सरांसमोर नव्याने धडे गिरवायला बसण्याची वृत्तीच तुला अजून मोठं करणार,” असं त्यांनी म्हटलं आहे.
तिप्पट टोलवसुलीनंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे ऋजुता देशमुख पुन्हा त्रस्त, म्हणाली, “नाटकाची बस...”
“ओंकार...ओंकारचं आणि माझं खास नातं आहे...understanding आहे...मला स्वतःला ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात...हॉलिवूडची प्रत्येक अँक्शन फिल्म आम्ही एकत्र बघतो...क्रिकेट आमच्या दोघांचाही श्वास आहे..अरजित सिंहचं "खैरियत पूछो" हे गाणं आम्हा दोघांना ही प्रचंड आवडतं. आमच्या राऊतला "कंटाळा" आणि "आता कशाला?" हे शब्द खूप आवडतात. वरवर अत्यंत बेपर्वा आणि cool वाटणारा ओंकार स्वतःच्या कामाबद्दल अत्यंत सिरियस आहे. एखादं स्किट पडल्यावर स्वतःवरच चिडणारा ओंकार मी जवळून बघितलाय...वरकरणी अत्यंत कोरडा वाटणारा आमचा मनोमिलन स्वरछेडे आतून खूप हळवा आहे...अश्या या मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...”, असं म्हणत चौघुलेंनी ओंकारसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
“महाभारतावर चित्रपट बनला तर हनुमानाची भूमिका...”, ‘त्या’ वक्तव्यामुळे टायगर श्रॉफ ट्रोल
ओंकारने ‘फ्रेशर्स’, ‘फुलपाखरू’ यांसारख्या मालिकेत काम केलं आहे. ‘काळे धंदे’ या मराठी वेब सीरिजमध्येही तो दिसला होता. ‘लकडाऊन’, ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास ३’ या चित्रपटांमध्ये ओंकारने साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या.