Vanita Kharat Wedding: क्या बात! प्राजक्ता माळीने वनिता खरातला दिलं लग्नाचं खास गिफ्ट, पाहा तर...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 03:04 PM2023-02-01T15:04:46+5:302023-02-01T15:05:00+5:30

Vanita Kharat Wedding, Prajakta Mali : लग्नाआधीच प्राजक्ताने विनीला एक सुंदर गिफ्ट दिलं. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Maharashtrachi Hasyajatra fame prajakta mali wedding gift to vanita kharat | Vanita Kharat Wedding: क्या बात! प्राजक्ता माळीने वनिता खरातला दिलं लग्नाचं खास गिफ्ट, पाहा तर...!!

Vanita Kharat Wedding: क्या बात! प्राजक्ता माळीने वनिता खरातला दिलं लग्नाचं खास गिफ्ट, पाहा तर...!!

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम वनिता खरात (Vanita Kharat) उद्या २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) ती लग्नगाठ बांधणार आहे. तर लग्नविधी सुरू झाले आहेत. काल वनिताच्या हातांवर मेहंदी सजली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे अनेक कलाकार या मेहंदी सोहळ्याला हजर होते. प्राजक्ता माळी (Prajakta Mali) या सोहळ्यात होती की नव्हती ते कळायला मार्ग नाही. पण हो, प्राजक्ताने वनिताला लग्नाचं सुंदर गिफ्ट दिलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्राजक्ता माळी होस्ट करतेय. तर वनिता या शोची स्पर्धक आहे. दोघीही चांगल्या मैत्रिणी. आता मैत्रिणीचं लग्न म्हटल्यावर तिला आवडेल, तिच्या आयुष्यभर आठवणीत राहिल अशी भेट तिला द्यायलाच हवी. लग्नाआधीच प्राजक्ताने विनीला एक सुंदर गिफ्ट दिलं. त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये प्राजक्ता वनिताला एक ज्वेलरी बॉक्स देताना दिसतेय.

या बॉक्समध्ये काय आहे तर, सोनसळा सेट. होय, प्राजक्ताने नुकताच प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. आपल्या या ब्रँडचे दागिने प्राजक्ताने वनिताला गिफ्ट दिलेत. वनिता हे दागिने पाहून प्रचंड खुश झाली.  वनिताने आपल्या लग्नात प्राजक्तराजचे दागिने घालावे अशी इच्छा प्राजक्ताने यावेळी व्यक्त केली. 

वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. तर वनिता ही विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वनिताचा सरला एक कोटी हा चित्रपट 20 जानेवारी या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात तिनं गुड्डी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वनितासोबतच ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
 

Web Title: Maharashtrachi Hasyajatra fame prajakta mali wedding gift to vanita kharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.