सर्वांना खळखळून हसवणारा 'हास्यजत्रा फेम' प्रसाद खांडेकर बायकोला मात्र...शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 12:45 IST2023-03-05T12:43:37+5:302023-03-05T12:45:04+5:30
प्रसादने बायकोबरोबरचा एक फोटो पोस्ट करत छान कॅप्शन लिहिले आहे.

सर्वांना खळखळून हसवणारा 'हास्यजत्रा फेम' प्रसाद खांडेकर बायकोला मात्र...शेअर केली खास पोस्ट
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. मात्र खऱ्या आयुष्यात बायकोला वेळच देता येत नसल्याचं त्याने नुकतंच मान्य केलं. त्याच्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त त्याने केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने या वर्षात बायकोला भरपूर वेळ देणार अशी प्रांजळ कबुलीही दिली आहे.
कलाकार त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे अनेकदा कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. अनेक कलाकारांनी बऱ्याच वेळा ही खंत बोलून दाखवली आहे. आता प्रसाद खांडेकरची पोस्टही चर्चेत आहे. आज बायकोच्या वाढदिवसानिमित्त त्याने तिला खास वचनही दिलं आहे.
प्रसादने बायकोबरोबरचा एक फोटो पोस्ट करत छान कॅप्शन लिहिले आहे. तो लिहितो, 'हॅप्पी बर्थडे माय डियर बायको अल्पा…अशीच हसत राहा, अशीच ओरडत राहा, अशीच प्रेम करत राहा, आणि सर्वात महत्वाचं, अशीच कायम खुश राहा, मला माहित्येय तुला गिफ्ट म्हणून माझा वेळ हवाय आणि तो मी येत्या वर्षात खुप देईन आय प्रॉमिस आणि श्लोक सोबतच तुझा “sweet memories”चा केक बिझनेससुद्धा मोठा होतोय हे बघून भारी वाटतय …आय लव्ह यू डार्लिंग! माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर…. तुला जे जे हवं ते सगळं मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.'
सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या शोमध्ये असलेले सर्व कलाकार आज स्टार झालेत. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. तर काही जणांनी सिनेमा, मालिकेतही पदार्पण केले आहे.