'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:52 PM2024-11-25T12:52:24+5:302024-11-25T12:53:28+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालंय (priyadarshini indalkar, maharashtrachi hasyajatra)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा आवडता शो. गेली ४ वर्षांहून अधिक काळ हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सर्वच कलाकारांवर लोक भरभरुन प्रेम करतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. परदेशातही या कलाकारांवर प्रेमाचा वर्षाव करतात. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचं स्वप्न पूर्ण झालंय. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या.
प्रियदर्शनी इंदलकरचं स्वप्न झालं पूर्ण
झालं असं की, सध्या प्रियदर्शनी इंदलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमसोबत लंडन दौऱ्यावर आहे. त्यावेळी लंडनमधील एका थिएटरमध्ये प्रियदर्शनीला परफॉर्म करण्याची संधी मिळाली. याविषयी पोस्ट टाकून प्रियदर्शनी लिहिते की, "London मध्ये जाऊन musical/ नाटक पाहणं हे खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं… पण काही बघायच्या आधीच, इथे चक्क perform करता आलं ! Sometimes universe has better plans than your dreams and goals." अशाप्रकारे जिथे प्रियदर्शनीला नाटक पाहायचं होतं तिथे ती स्वतःचं नाटक प्रेक्षकांना दाखवणार आहे.
प्रियदर्शनीच्या आयुष्यात घडला आणखी एक योगायोग
याशिवाय लंडनला गेल्यावर प्रियदर्शनीच्या आयुष्यात आणखी एक योगायोग आला. तो म्हणजे सेंट्रल लंडनमधील शॉ थिएटरमध्ये प्रियदर्शनीला परफॉर्म करण्याची संधी मिळाली. या थिएटरचं नाव थोर नाटककार बर्नार्ड शॉ यांच्या नावावरुन प्रेरित आहे. शॉ यांनी 'माय फेअर लेडी'वर आधारीत 'पिगमॅलिअन' नाटक लिहिलं. याच नाटकाचं पुढे पु.ल.देशपांडेंनी 'ती फुलराणी' या मराठी नाटकात मराठी नाटकात रुपांतर केलं. काही वर्षांपूर्वी या नाटकावर आधारीत 'फुलराणी' सिनेमात प्रियदर्शनीने अभिनय केला होता. अशाप्रकारे हा विलक्षण योगायोग प्रियदर्शनीच्या आयुष्यात आला.