"मी पहिल्यांदाच भारताबाहेर आलेय...", लंडनला गेलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 06:56 PM2023-07-14T18:56:02+5:302023-07-14T18:57:04+5:30
लंडनला गेलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लाडका शो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेतील कलाकार अफलातून कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. मराठी तसेच हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरही हास्यजत्रेमुळे घराघरात पोहोचली. हास्यजत्रेने रसिकाला लोकप्रियता मिळवून दिली.
रसिका सध्या शूटिंगनिमित्त लंडनला आहे. नुकताच तिचा वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. "माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या माध्यमातून तुमच्या शुभेच्छा तुमचं प्रेम माझ्या पर्यंत पोहोचलं..सगळ्यांचे खूप खूप आभार..खूप प्रेम !! सगळ्यांना पर्सनली रिप्लाय करणं अशक्य आहे. पण तुमच्या शुभेच्छांमुळे मला भरुन आलं आहे. या वर्षीचा वाढदिवस विशेष होता. कारण पहिल्यांदाच मी भारताबाहेर आलेय, लंडनला...“ वडापाव “ या सिनेमाच्या शूटिंग साठी..त्यामुळे भारत आणि यूके असा एकंदर दोन दिवस माझा वाढदिवस साजरा झाला," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर सुसाट! केदार शिंदेंच्या चित्रपटाने १४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी
रसिकाने पुढे म्हणते, "१० जुलै भारतातल्या रात्री १२ वाजता मी लंडनमध्ये सिनेमाचं शूटिंग करत होते आणि दुसऱ्या दिवशी ११ जुलैला ऑफ होता, म्हणून एकटीने लंडन फिरायचं ठरवलं. लंडन पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्यूब, बस आणि जास्तीत जास्त चालत लंडन आय, बिग बेन, द रिव्हर थॅमेस, व्हिक्टोरीया गार्डन असं छान फिरले...लंडनमध्ये एकट्याने फिरायची मजा काही औरच आणि मग चालत पोहचले डच थिएटरजवळ...नशीबाने मला “द प्ले दॅट गोज राँग“ या नाटकाचं ऑन द स्पॉट टिकीट मिळालं आणि कमाल मज्जा आली. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सिनेमाचं शूटिंग, एकटयाने भटकणं, नवीन गोष्टी एक्सप्लोर करणं, नाटक पाहणं , स्वतःला पँपर करणं असं सगळच करता आलं. लंडनमधील माझा हा वाढदिवस बेस्ट होता. थोडी घरची आठवण आली, पण प्रसाद ओक सर, मंजिरी ताई आणि वडापाव फॅमिलीला धन्यवाद."
रसिका प्रसाद ओकच्या 'वडापाव' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी रसिकाने 'फ्रेशर्स', 'देवयानी' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बाकरवडी' या हिंदी मालिकेतही ती झळकली होती.