'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेच्या पत्नीने शेअर केले नव्या घरातील फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:53 AM2024-01-30T11:53:20+5:302024-01-30T11:54:35+5:30

सातारच्या रोहित मानेच्या पत्नीची पोस्ट पाहिली का?

maharashtrachi hasyajatra fame rohit mane s wife shared photos from new house | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेच्या पत्नीने शेअर केले नव्या घरातील फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम रोहित मानेच्या पत्नीने शेअर केले नव्या घरातील फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या अगदी जवळचे झाले आहेत. समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता आवटे, गौरव मोरे यांच्यासह प्रत्येक कलाकाराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामध्ये रोहित माने (Rohit Mane) या कलाकारनेही आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. काही दिवसांपूर्वीच रोहितचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं. आता त्याची पत्नी श्रद्धा मानेने नव्या घरातील फोटो शेअर सुंदर पोस्ट केली आहे. 

रोहित आणि पत्नी श्रद्धा मराठीतील रोमँटिक कपल आहे. दोघंही आता नव्या घरात शिफ्ट झाल्याने आनंदात आहेत. श्रद्धाने रोहितसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले,"घर..शब्द खूप छोटा आहे पण त्याचं वजन खूप मोठं आहे. घराचं स्वप्न आपण एकत्र पाहिलं आणि ते एकत्र पूर्ण केलं. आज स्वत:च्या घरात फोटो काढताना फारच कमाल वाटत होतं. आईबाबांचेही खूप आभार..तुम्ही मला स्वप्न बघायला शिकवली आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच पाठीशी उभे राहिलात."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामुळे कलाकारांचं नशीबच पालटलं आहे. अनेकांचं मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तर काही कलाकारांना सिनेमाची लॉटरी लागली आहे. प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमात रोहितनेही काम केलं. सातारच्या रोहित मानेने मुंबईत येऊन सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलं यामुळे सगळेच त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame rohit mane s wife shared photos from new house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.