'वडिलांचं छत्र हरपलं अन्...';बाबांच्या निधन झाल्यानंतर अशी झाली होती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्याची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 19:00 IST2023-06-12T18:59:26+5:302023-06-12T19:00:17+5:30
VIraj jagtap: प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विराजने खऱ्या आयुष्यात अनेक दु:खं झेलली आहेत.

'वडिलांचं छत्र हरपलं अन्...';बाबांच्या निधन झाल्यानंतर अशी झाली होती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्याची अवस्था
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyjatra) हा कार्यक्रम गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज लोकप्रिय झाला असून प्रेक्षकांना तो आपल्या घरातील एक सदस्यचं असल्यासारखा वाटतो. या कार्यक्रमातील समीर चौघुले, नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर यांची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. मात्र, यावेळी अभिनेता विराज जगताप याची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विराजने खऱ्या आयुष्यात अनेक दु:खं झेलली आहेत. एका मुलाखतीत त्याने याविषयी भाष्य केलं आहे.
विराज एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला असून अगदी सामान्यपणे त्याचं बालपण गेलं आहे. इतकंच नाही तर वडिलांचं लवकर निधन झाल्यामुळे त्याच्या बहिणींनी त्याला करिअर घडवण्यास मदत केली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अवलीच्या रिअल लाइफ पावलीला पाहिलंय का? राहते अत्यंत साधी
"आजी, आजोबा आणि माझे बाबा आम्ही सगळे एकत्र राहत होतो. पण, वृद्धपकालाने आजी -आजोबांचं निधन झालं. त्यानंतर काही वर्षांनी बाबाही आम्हाला सोडून गेले. घरातील आधार गेल्यानंतर माझ्या बहिणींनी मला खूप पाठिंबा दिला. ११-१२ वी मध्ये असताना आम्हाला पार्ट टाइम नोकरी करायची सवय लागली. पण, बाबांच्या निधनानंतर खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, माझ्या मित्र-मैत्रिणी, शेजारचे लोक, नातेवाईक, बहिणी यांनी कधीही मला ती उणीव भासू दिली नाही", असं विराज म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "घरातची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली आणि या गोष्टीचं माझ्यावर दडपण येतंय याची मला जाणीव होत होती. पण, सगळ्यांनी मला छान सांभाळून घेतलं. सगळ्यांची साथ असल्यामुळे बाबा गेल्यानंतर जे दडपण होतं त्याचा फारसा त्रास झाला नाही."
दरम्यान, मध्यंतरी विराजकडे काम नव्हतं. त्या काळात त्याच्या बहिणींनी त्याला खूप पाठिंबा दिला असंही त्याने यावेळी सांगितलं.