विशाखा सुभेदारच्या लव्हमॅरेजला होता घरच्यांचा विरोध, म्हणाली, "घरी कळाल्यानंतर मला १५ दिवस..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:45 PM2023-09-16T18:45:46+5:302023-09-16T18:46:13+5:30
विशाखा जितकी रोमँटिक आहे तितकीच तिची लव्हस्टोरीही फिल्मी आहे. विशाखाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिची फिल्मी लव्हस्टोरी सांगितली.
दमदार अभिनय आणि विनोदाने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी लाडकी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. अनेक मालिका, विनोदी कार्यक्रम आणि चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेल्या विशाखाला प्रेक्षक आजही मिस करतात. विशाखा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक रील व्हिडिओ ती शेअर करत असते. विशाखा जितकी रोमँटिक आहे तितकीच तिची लव्हस्टोरीही फिल्मी आहे.
विशाखाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिची फिल्मी लव्हस्टोरी सांगितली. लव्हमॅरेजला घरच्यांचा विरोध असल्याचा खुलासाही या मुलाखतीत विशाखाने केला. ती म्हणाली, “लग्नाआधी मी माझ्या नवऱ्याला दादा म्हणायचे. काकस्पर्श या नाटकामुळे आमची भेट झाली. या नाटकाचा तो असिस्टंट दिग्दर्शक होता. तेव्हा मी लहान होते. त्याने मला एक दिवस तू मला दादा म्हणू नको असं सांगितलं. काळजी करणारा, प्रेम करणारा माणूस बायकांना हवा असतो. तेव्हा आर्थिक गणितं डोक्यात नसतात. त्याचं काळजी करणं, प्रेम करणं आवडायला लागलं आणि मी हो म्हणाले.
"जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या", विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, "सई, अमृता..."
“आमच्या लग्नाला आईवडिलांकडून विरोध होता. माझ्या वडिलांना मी नाटकात काम केलेलंच आवडत नव्हतो. तर नाटकात काम करणाऱ्या माणसाशी लग्न करणं, त्यांना कसं आवडेल? माझ्या आजीने मग आईवडिलांना सांगितलं. तिच्या क्षेत्रात काम करणारा माणूस तिला भेटला आहे, तर तुम्ही कशाला अडवताय? आजीमुळे माझ्या वडिलांनी लग्नाला होकार दिला. पण लग्नाआधी त्यांनी आमची मुलगी टीव्हीत दिसली पाहिजे, ही अट ठेवली होती. आणि तो शब्द माझ्या नवऱ्यानेही पाळला. आमची लव्हस्टोरी पण कमाल होती. घरी कळल्यावर १५ दिवस आई बोलत नव्हती. कोंडून ठेवलेलं...फूल एक दुजे के लिए...”, असंही पुढेही विशाखाने सांगितलं.
विशाखा सध्या ‘शुभविवाह’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. तिने ‘कुर्रर्र’ या नाटकातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. विशाखाने अनेक सुपरहिट मालिकांबरोबरच चित्रपटांतही विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.