USA दौऱ्यात फ्लाईट रद्द झाल्यानं 'हास्यजत्रा'च्या कलाकारांची झाली पंचाईत; पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:51 AM2023-07-13T11:51:15+5:302023-07-13T11:52:21+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे चाहते देशातच नाही तर देशाबाहेरही आहेत.

maharashtrachi hasyajatra team in USA priyadarshini indalkar shared experience when they got late for the show what happened next | USA दौऱ्यात फ्लाईट रद्द झाल्यानं 'हास्यजत्रा'च्या कलाकारांची झाली पंचाईत; पुढे काय घडलं?

USA दौऱ्यात फ्लाईट रद्द झाल्यानं 'हास्यजत्रा'च्या कलाकारांची झाली पंचाईत; पुढे काय घडलं?

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमाची टीम सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. अमेरिकेतल्या विविध राज्यात आणि शहरात त्यांचे शोज हाऊसफुल सुरु आहेत. हास्यजत्रा सातासमुद्रापारही किती लोकप्रिय आहे याचा प्रत्यय नुकताच या सर्व कलाकारांना आला. अमेरिकेतील मूळ भारतीय लोक तब्बल तास कलाकारांची वाट बघत नाट्यागृहात बसले होते. इतकंच नाही तर २ तास उशिरा आलेल्या कलाकारांचं सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं. याचा व्हिडिओ प्रियदर्शनी इंदलकरने पोस्ट केला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे चाहते देशातच नाही तर देशाबाहेरही आहेत. अमेरिकेतील एका शोला पोहोचायला जेव्हा उशीर होतो तरी प्रेक्षक इतक्या वेळ कळ सोसून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करतात तेव्हाची भावना ही शब्दात न मांडता येणारीच आहे. 

प्रियदर्शनीने लिहिले, 'आमची फ्लाईट रद्द झाली. ४ वाजता न्यू जर्सीला शो होता आणि आम्ही २ वाजेपर्यंत अजून बॉस्टन लाच होतो. हे समजल्यावर लगेच बॉस्टनच्या महाराष्ट्र मंडळाचे लोक विमानतळावर पोहचले. आमच्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली. न्यू जर्सीच्या लोकांना निरोप देण्यात आला की ४ चा शो ७ वाजता सुरु होईल कारण असं असं झालंय. रस्त्यात जेवणासाठी १६ min थांबून आम्ही फुल स्पीड ने ५ तासांच्या ड्राईव्हसाठी निघालो. नेमका ट्रॅफिकनेही आम्हाला त्रास दिला. गेल्या गेल्या शो सुरु करता यावा म्हणुन आम्ही गाडीतच मेकअप केला. केस आवरले. प्रेक्षकाना zoom call करुन विनंती केली की अजून काही काळ please कळ सोसा, आम्ही पोहोचतच आहोत.

प्रियदर्शनी पुढे म्हणाली, 'त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली. जवळपास ९०० लोक, sold out show, २ तास आमची वाट पाहत होते आणि टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत झालं. खूप लांबून लोक आले होते आणि सगळे थांबले होते. हास्यजत्रेवरचं हे प्रेम पाहुन आम्ही सगळे भारावुन गेलो होतो. मी नशिबवान आहे की या टीमचा भाग आहे. USA Tour मधल्या न्यू जर्सीच्या शो साठी केलेली धावपळ आणि त्यावरचा प्रतिसाद हा कायम आठवणीत राहील.' 

प्रियदर्शनीने या सर्व धावपळीचा व्हिडिओही शेअर केला आहे. हास्यजत्रेच्या टीमला आलेला हा अनुभव खरोखरंच भावुक करणारा आहे. सर्वच कलाकारांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. मग त्यांनी पाहण्यासाठी आणि कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी लोकांचीही कितीही वेळ वाट बघायची तयारी आहे हे दिसून आलं. 'तुम्ही या प्रतिसादाला पात्रच आहात' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी पोस्टवर केल्या आहेत.

Web Title: maharashtrachi hasyajatra team in USA priyadarshini indalkar shared experience when they got late for the show what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.