निखिल बनेने घडवलं चाळ संस्कृतीचं दर्शन; म्हणतो, "कामावरुन घरी येऊन रात्रभर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:55 PM2024-01-30T12:55:24+5:302024-01-30T12:56:11+5:30
"मुंबईतील इमारतींच्या जंगलात...", निखिल बनेनी दाखवली चाळ संस्कृतीची झलक
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय टीव्ही शोने अनेक नवोदित कलाकारांनाही अभिनयात त्यांचं करिअर करण्याची संधी दिली. याच संधीचा पुरेपूर फायदा घेत हास्यवीर निखिल बनेने त्याच्या कुशल अभिनय आणि विनोदबुद्धीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. निखिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही निखिल अनेकदा व्यक्त होताना दिसतो.
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला बने मराठी कलाविश्वात हळूहळू जम बसवत आहे. हास्यजत्रेतून चाहत्यांना भुरळ पाडणारा निखिल बने अजूनही भांडुपच्या चाळीत राहतो. चाळीतील सणवारांचे अनेक व्हिडिओही बने नेहमी शेअर करत असतो. नुकतंच बनेच्या चाळीत सत्यनारायणाची पूजा पार पडली. यासाठी खास चाळीचं महत्त्व सांगणारा देखावा उभा करण्यात आला होता. याची झलक बनेने व्हिडिओतून दाखवली आहे. याबाबत त्याने सविस्तर पोस्टही लिहिली आहे.
निखिल बनेची पोस्ट
सत्यनारायण महापूजा २०२४
मखर - चाळ संसकृती
आजकाल इमारतींच्या जंगलात मुंबईची "चाळ संसकृती" कुठेतरी लोप पावत चालली आहे. ह्याच पार्श्वभूमीवर ह्या वर्षी चाळीच्या सत्यनारायण पूजेचा मखर तयार केला होता.
सगळ्या मुलांनी खूप मेहनत घेऊन हे सगळं तयार केलंय. कामावरून घरी येऊन रात्र रात्र जागून मजा, मस्ती करत हे सगळं काम पूर्ण केलं आहे. ते म्हणतात ना खरी मज्जा चाळीतच आहे आणि म्हणूनच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. ह्या कार्यात कळत नकळत अनेक लोकांचे हात लागले आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप आभार.
बनेच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहते बनेचं कौतुकही करत आहेत.