होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:09 IST2025-01-17T14:09:25+5:302025-01-17T14:09:43+5:30

काही दिवसांपूर्वीच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा करण्यात आली होती. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे.

maharshtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar to host almost comedy marathi stand up show | होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन

होस्ट अन् रोस्ट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर करणार ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ शोचं करणार सूत्रसंचालन

अनेक स्टँड अप कॉमेडी शोचे रील्स व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच या शो विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली. 

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोमध्ये लेखक चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज लेखक प्रत्यक्ष स्टेजवर येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. याआधी त्यांच्या लेखणीतून साकारलेली हास्यनिर्मिती आपण पाहिली आहे. आता त्यांचा स्टेजवरील धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. तर या शोचं सूत्रसंचालन महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर करणार आहे. 

येत्या २४ जानेवारीला ‘ऑलमोस्ट कॉमेडी’चा पहिला एपिसोड एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियदर्शनी इंदलकर सुत्रसंचलनाबरोबर लेखकांना रोस्ट देखील करणार आहे. आता आठवड्याचा प्रत्येक शुक्रवार हा प्रेक्षकांसाठी हास्याचा खास दिवस ठरेल यात शंकाच नाही.

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली, "मला जेव्हा अमोलचा फोन आला की आम्ही एक शो करतोय आणि तुला या शोचे होस्टिंग करत या लेखकांना रोस्ट करायचे आहे. मी खूप आश्चर्यचकित झाले. इतके मोठे, अनुभवी कलाकार असूनही त्यांनी मला फोन केला. मी याला एक चांगली संधीच म्हणेन. कारण या आधी मी कधी अशा प्रकारचे काम केले नाही. स्टँडअप हा प्रकार मला ट्राय करायचा होता आणि या शोच्या निमित्ताने मला याचा अनुभव घेता आला. सगळ्यांनी मला या प्रवासात खूप सांभाळून घेतले. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि संजय छाब्रिया यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ही संधी दिली. आता हा आमचा प्रवास अजून लांबपर्यंत चालणार असून अजून जास्त लोकांपर्यंत हे आम्ही पोहोचवणार आहोत."

Web Title: maharshtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar to host almost comedy marathi stand up show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.