डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर येणार महेश कोठारे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 08:22 AM2018-04-10T08:22:05+5:302018-04-10T14:20:29+5:30
डान्स महाराष्ट्र डान्स हे व्यासपीठ ज्या व्यक्तीला नाचता येतं त्याच्यासाठी पंढरी आहे. या मंचावर ना वयाचे बंधन आहे ना ...
ड न्स महाराष्ट्र डान्स हे व्यासपीठ ज्या व्यक्तीला नाचता येतं त्याच्यासाठी पंढरी आहे. या मंचावर ना वयाचे बंधन आहे ना नृत्यप्रकाराचे. यात एखादा डान्सर सोलो किंवा ग्रुपमध्ये आणि मुख्य म्हणजे विविध नृत्यशैली लोकांसमोर आणतो. नृत्याचे विविध पारकर या कार्यक्रमाद्वारे आपल्याला पाहायला मिळतात. आजपर्यंत कोणत्याही वाहिनीने या प्रकारचा खुला मंच डान्सर साठी उपलब्ध करून दिला नाही आणि हेच डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचे वेगळेपण आहे या कार्यक्रमाचे तीन मुख्य शिलेदार आहेत ते म्हणजे या कार्यक्रमाचे परीक्षक.सिद्धार्थ जाधव , फुलवा खामकर आणि आदित्य सरपोतदार आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुव्रत जोशी हा कलाकार करत आहे.
या बुधवारी ११ एप्रिल आणि १२ एप्रिल ला मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज असे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी उपस्थिती लावली आहे .त्यांच्या स्वागतासाठी डान्स महाराष्ट्र डान्स च्या सर्वच डान्सरनी भरपूर मेहनत केली आहे . बुधवारी होणाऱ्या एपिसोड मध्ये डान्स महाराष्ट्र डान्स च्या स्पर्धकांनी मराठी चित्रपट सृष्टीतील मानवंदना दिली आहे . त्यातच डान्स महाराष्ट डान्स च्या सद्दाम या स्पर्धकाने नेहमी प्रमाणे अतिशय हृदयाला हात टाकणारा परफॉर्मन्स दिला . महेश कोठारे आणि लक्ष्याची मैत्री त्याने ऍक्ट द्वारे सादर केली .सद्दाम चा ऍक्ट एवढा हृदयस्पर्शी होता की महेश कोठारेंनी डान्स महाराष्ट्र डान्स च्या मंचावर डोळे पुसत 'रुला दिया सालेने ..' हे भावोद्गार काढले .