मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 06:30 IST2018-10-15T15:59:02+5:302018-10-17T06:30:00+5:30

नियतीच्या विचित्र खेळामुळे मरियम आपल्या पालकांपासून दुरावते आणि मनजीत या नव्या नावाने आपला पुढील जीवनप्रवास सुरू करते असे आता मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Mahima Makwana entry in Mariam Khan - Reporting Live | मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेला मिळणार हे वळण

मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेला मिळणार हे वळण

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये आता लीप घेतला जाणार असून मरियम खानची भूमिका अभिनेत्री महिमा मकवाणा साकारणार आहे. ती महिमाची एक अगदी नवी आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा उभी करणार आहे. आपल्या अनेक भूमिकांमधून विविध व्यक्तिरेखांची वैशिष्ट्यपूर्ण रूपे आणि देहबोली उभी करण्यात महिमाचा हातखंडा आहे. मरियमची व्यक्तिरेखा साकारण्यास ती खूप उत्सुक आहे. 

नियतीच्या विचित्र खेळामुळे मरियम आपल्या पालकांपासून दुरावते आणि मनजीत या नव्या नावाने आपला पुढील जीवनप्रवास सुरू करते असे आता मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल महिमा सांगते, “मी नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका रंगविण्यास तयार असते; कारण त्यामुळे माझ्यातील अभिनेत्रीला वैविध्यपूर्ण अभिनयगुणांची व्याप्ती दाखविण्याची संधी मिळते. मरियमची व्यक्तिरेखा ही मी स्टार प्लसवर रेखाटलेल्या अखेरच्या भूमिकेपेक्षा अगदीच भिन्न स्वरूपाची आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर एक वेगळंच व्यक्तिमत्त्व असलेल्या मरियमचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक साधीसुधी मुलगी प्रत्येक प्रसंगाला कशाप्रकारे सामोरी जाते हे मालिकेद्वारे दाखवण्यात येणार आहे यापूर्वी देश्ना दुग्गडने मरियमची व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे साकारली होती. ही मालिका, यातील व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मालिकेचा मी भाग होत असल्याचा मला आनंद होत आहे.”

लीपनंतर मरियम टॅक्सी चालक असल्याचे दाखवण्यात येणार आहे. यासंदर्भात महिमा सांगते, “रिश्तों का चक्रव्यूह या माझ्या आधीच्या मालिकेसाठी मी मार्शल आर्ट शिकल होते. प्रत्येक नव्या मालिकेत मला नवं काहीतरी शिकायला मिळत आहे याचा मला आनंद होत आहे. नवीन गोष्ट शिकण्याची मला आवड असल्याने मला यासारख्या वेगळ्या भूमिका स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळते. नव्या मालिकेतील नवी आव्हानं स्वीकारण्यास मी सदैव तयार असते. त्यामुळे या मालिकेत मला एका टॅक्सी चालकाची भूमिका रंगवायची आहे, असं मला सांगण्यात आलं तेव्हा मी टॅक्सी चालक म्हणून कशी दिसेन, यावर मी विचार करू लागले. माझं गाडी चालविणं अधिकाधिक सहज कसं दिसेल, त्यावर अभ्यास करत आहे. मला यापूर्वीच्या मालिकांमध्ये प्रेक्षकांचं जसं प्रेम आणि आधार लाभला होता, तसाच तो या मालिकेतही लाभेल, अशी मला आशा आहे.”

Web Title: Mahima Makwana entry in Mariam Khan - Reporting Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.