Prarthana Behere : ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवरचा प्रार्थनाचा शेवटचा दिवस, असा शूट झाला Last एपिसोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 05:53 PM2023-01-11T17:53:38+5:302023-01-11T17:55:59+5:30
Prarthana Behere, Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहाची भूमिका साकारणाऱ्या प्रार्थना बेहरेनं याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे...
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंस केलं. मालिका आली आणि तुफान लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रार्थना बेहरे ( Prarthana Behere) व श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade) मालिकेतील रोमॅन्टिक केमिस्ट्रीही तुफान हिट ठरली. मालिका इतकी गाजली. इतकी की, सप्टेंबर महिन्यात मालिका बंद झाली असताना प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरू करावी लागली. पण आता पुन्हा एकदा निरोपाची वेळ जवळ आली आहे. होय, 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका लवकरच निरोप घेतेय. नुकताच मालिकेचा शेवटचा एपिसोड चित्रीत करण्यात आला. मालिकेत नेहाची भूमिका साकारणाऱ्या प्रार्थना बेहरेनं याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रार्थनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने शूटिंगचा शेवटचा दिवस असा उल्लेख केला आहे. यामध्ये प्रार्थना लाल रंगाच्या साडीमध्ये रस्त्यावर धावत येताना दिसतेय. याआधी मालिकतील बालकलाकार मायरा वैकुळने आपल्या शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याचं सांगत एक व्हिडीओ शेअर केला होता. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा आगळावेगळा विषय प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला होता. विवाहित मात्र पतीपासून विभक्त झालेली नेहा आणि गर्भश्रीमंत, उच्चशिक्षित यश यांची ही हटके लव्हस्टोरी होती.
एका मुलाखतीत प्रार्थनाने ही मालिका स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं होतं. गेला गेल्या काही वर्षात खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. म्हणून मी जाणीवपूर्वक मालिकांना नकार देत गेले. परंतु गेली दोन वर्ष मी चित्रपटांमध्ये देखील झळकलेली नाही. त्यामुळे सतत मला चित्रपटात कधी झळकणार असा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे मला एक कळलं की प्रेक्षकांना मला पाहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मी मालिकेद्वारे पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला,’ असं प्रार्थनानं सांगितलं होतं.