प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर दिसणार या मालिकेत, साकारणार ही भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 12:13 PM2021-04-03T12:13:17+5:302021-04-03T12:15:35+5:30

अभिजीत आता एका नव्या मालिकेत दिसणार आहे. पण तो या मालिकेत अभिनय करणार नसून सूत्रसंचालन करणार आहे.

Majhya Navryachi Bayko fame abhijeet khandkekar will be act in criminal chahul gunhegaranchi | प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर दिसणार या मालिकेत, साकारणार ही भूमिका

प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर दिसणार या मालिकेत, साकारणार ही भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देक्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेचे सूत्रसंचालन अनुप सोनीने केले होते. त्याच्यामुळे या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील गुरुनाथ उर्फ गॅरीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेत आपल्याला अभिजीत खांडकेकरला पाहायला मिळाले होते. या मालिकेतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. 

माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर काय करतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. अभिजीत आता एका नव्या मालिकेत दिसणार आहे. पण तो या मालिकेत अभिनय करणार नसून सूत्रसंचालन करणार आहे.

क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेचे सूत्रसंचालन अनुप सोनीने केले होते. त्याच्यामुळे या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. याच मालिकेच्या धर्तीवर 'क्रिमिनल्स... चाहूल गुन्हेगारांची' ही मराठी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे सूत्रसंचालन अभिजीत करणार आहे. 

अभिजीत खांडकेकरने आरजे म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो अभिनयक्षेत्राकडे वळला. माझ्या प्रियाला प्रीत कळेना ही त्याची पहिलीच मालिका प्रचंड गाजली. या मालिकेनंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

Web Title: Majhya Navryachi Bayko fame abhijeet khandkekar will be act in criminal chahul gunhegaranchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.