रिअल लाइफमध्ये इतकी ग्लॅमरस दिसते 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील रेवती, पाहा तिचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 14:49 IST2019-10-04T14:44:04+5:302019-10-04T14:49:21+5:30
मुळात रिअल लाइफमध्येही श्वेता तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. श्वेताला मॉर्डन रहायला आवडतं. श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

रिअल लाइफमध्ये इतकी ग्लॅमरस दिसते 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील रेवती, पाहा तिचा अंदाज
मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळातं. तसेच आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब प्रत्येक कलाकाराच्या लक्षात येऊ लागली आहे.
'माझ्या नव-याची बायको' ही मालिका तुम्ही पाहात असणा-यांसाठी श्वेता हे नाव काही नवीन नाही.या मालिकेत पुरुषांबद्दल प्रचंड चीड असणारी आणि राधिकाच्या कठीण प्रसंगी खांद्याला खांदा भिडवून राहणारी रेवती म्हणजेच श्वेता मेहंदळे. या मालिकेत नेहमीच कुर्ता किंवा साडीमध्ये श्वेता पाहायला मिळते. आता तिचा एक नवीन फोटो समोर आला आहे. यांत तिचा मेकओव्हर झाल्याचा पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर श्वेता बरीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे. सुरुवातीचे तिचे फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर तिच्यामध्ये आलेला बदल तुम्हालाही सहज लक्षात येईल. तिच्या फोटोतील अंदाज कुण्या ग्लॅमरस दिवापेक्षा कमी नाही.
मुळात रिअल लाइफमध्येही श्वेता तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. श्वेताला मॉर्डन रहायला आवडतं. श्वेताचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो ग्लॅमरस असण्यासह तितकेच घायाळ करणारे आहेत. या प्रत्येक फोटोमधील श्वेताची दिलखेचक अदांवर कोणीही फिदा होइल असेच हे फोटो आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.