वयाच्या ४० व्या वर्षी टीव्ही अभिनेत्याचा मृत्यू, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 19:39 IST2020-04-21T19:38:09+5:302020-04-21T19:39:02+5:30
नाही. अभिनय दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. अचूक टायमिंगमुळं कॉमेडी भूमिकांवर शबुराजची विशेष पकड होती.

वयाच्या ४० व्या वर्षी टीव्ही अभिनेत्याचा मृत्यू, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारा कलाकार म्हणजे अभिनेता शबुराज. कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारणा-या शबुराजने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली होती. कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. अभिनय दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. अचूक टायमिंगमुळं कॉमेडी भूमिकांवर शबुराजची विशेष पकड होती.
अशा भूमिका साकारताना होमपीचवर असल्याप्रमाणे त्याची कॉमेडी फटकेबाजी रसिकांनी अनुभवलीय. या भूमिकांमधून त्याने सशक्त अभिनयक्षमता दाखवली असून विनोदी भूमिकांमुळेच विनोदी अभिनेत्याच्या यादीत त्याचे नाव गणले जाते. अनेक भूमिकांनाही त्यानं शंभर टक्के न्याय दिला. मात्र अभिनयाची अष्टपैलू ओळख निर्माण करणा-या या अवलियाने आज संपूर्ण जगाला कायमचं अलविदा म्हटले आहे.
आपल्या छोट्याशा अभिनयकारकिर्दीत शुबराजने दर्जेदार भूमिका साकारत रसिकांना हसून हसून लोटपोट केले. निवडक भूमिका रसिकांच्या मनात आजही घर करुनही आहेत. मात्र कमी वयातच शबुराजने जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झालं. तो ४० वर्षांचा होता. एशियनेट या वाहिनीवरील कॉमेडी स्टार शोमधून तो घराघरात पोहोचला. अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला कोल्लम मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यानचा त्याने अखेरचा श्वास घेतला.