दिवाळीचा सण कृष्णाच्या जीवावर बेतणार; राया वाचवू शकेल का कृष्णाचे प्राण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 04:45 PM2021-11-03T16:45:00+5:302021-11-03T16:45:00+5:30

Man Jhala Bajind: लग्नाच्या वरातीत बस दरीत कोसळून जखमी झालेली कृष्णा या आजारपणातून आता कुठे तरी बरी होताना दिसत आहे. मात्र, तिच्यावरचं संकट अजूनही टळलेलं नाही.

Man Jhala Bajind krishna and raya lovestory start now | दिवाळीचा सण कृष्णाच्या जीवावर बेतणार; राया वाचवू शकेल का कृष्णाचे प्राण?

दिवाळीचा सण कृष्णाच्या जीवावर बेतणार; राया वाचवू शकेल का कृष्णाचे प्राण?

googlenewsNext

'मन झालं बाजिंद' (Man Jhala Bajind) या मालिकेला सध्या एक नवं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकमेकांशी कायम वाद घालणारे राया आणि कृष्णा आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहू लागले आहेत. या दोघांचही मनाविरुद्ध लग्न झालं असलं तरीदेखील आता कृष्णाने सत्य परिस्थिती स्वीकारली आहे. त्यामुळे ती कुठे तरी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर रायादेखील मन मारुन सगळं सांभाळत आहे. परंतु, या सगळ्यामध्ये कृष्णावरचं संकट अजूनही टळल्याचं दिसून येत नाही. मृत्यूच्या दारातून परत आलेली कृष्णा पुन्हा संकटात सापडणार आहे. 

लग्नाच्या वरातीत बस दरीत कोसळून जखमी झालेली कृष्णा या आजारपणातून आता कुठे तरी बरी होताना दिसत आहे. मात्र, तिच्यावरचं संकट अजूनही टळलेलं नाही. ऐन दिवाळीचा सण पुन्हा एकदा तिच्या जीवावर बेतणार असल्याचं पाहायला मिळत आहे. झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कृष्णाच्या पदराला आग लागल्याचं दिसून येत आहे. 

राया आणि कृष्णाच्या लग्नानंतर पहिला दिवाळ सण असल्यामुळे संपूर्ण घर दिव्याने लख्ख उजळून गेलं आहे. यामध्येच राया आणि कृष्णा परस्परातील वाद बाजूला ठेऊन या सणानिमित्त कुटुंबासोबत आनंद साजरा करत आहेत. खास घरात पुजादेखील ठेवण्यात आली आहे. मात्र, पूजा संपन्न झाल्यावर कृष्णा उठत असताना तिच्या पदराला आग लागते.

दरम्यान, कृष्णाच्या पदराला लागलेली आग पाहून सगळेच जण घाबरतात. परंतु, राया तातडीने ही आग विझवतो आणि कृष्णाला वाचवतो. त्यामुळे आता हळूहळू या दोघांमधील रुसवा, दुरावा दूर होतांना दिसत आहे. मात्र, हे नातं आता पुढे कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Man Jhala Bajind krishna and raya lovestory start now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.