'मन उडू उडू झालं'मधील साध्या भोळ्या दिपूचा डॅशिंग अंदाज, हृता दुर्गुळेचा फर्स्ट लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:45 PM2022-05-23T17:45:01+5:302022-05-23T17:46:12+5:30

Hruta Durgule: अभिनेत्री हृता दुर्गुळे 'टाईमपास ३' चित्रपटात झळकणार आहे. नुकताच तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

'Man Udu Udu Jhala' fame Hruta Durgule's first look from Timepass 3 out | 'मन उडू उडू झालं'मधील साध्या भोळ्या दिपूचा डॅशिंग अंदाज, हृता दुर्गुळेचा फर्स्ट लूक आला समोर

'मन उडू उडू झालं'मधील साध्या भोळ्या दिपूचा डॅशिंग अंदाज, हृता दुर्गुळेचा फर्स्ट लूक आला समोर

googlenewsNext

'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) मालिकेत दीपूने आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. दीपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे. हृताने नुकतेच प्रियकर प्रतीक शाह(Prateek Shah)सोबत मुंबईतील पवई येथे लग्नगाठ बांधली आहे. लवकरच हृता चित्रपटात झळकणार आहे. ती टाईमपास ३ (Timepass 3) चित्रपटात पालवीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यात ती डॅशिंग अंदाजात दिसते आहे.

नुकताच टाईमपास ३मधला हृता दुर्गुळेचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यात हृताने पालवी दिनकर पाटीलची भूमिका साकारली आहे. ती या टीझरमध्ये मारामारी करताना दिसते आहे. तिचा डॅशिंग अंदाज चाहत्यांना खूपच भावतो आहे. तसेच या टीझरमध्ये प्रथमेश परबची झलकही पाहायला मिळते आहे. हा टीझर पाहून चाहते चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


टाईमपास ३ चित्रपटात प्रथमेश परब, हृता दुर्गुळे, वैभव मांगले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टाईमपास ३च्या संवाद लेखनाची जबाबदारी अभिनेता-लेखक प्रियदर्शन जाधव याच्यावरच असल्याचे कळते आहे.


हृताने दुर्वा , फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केले आहे. याशिवाय ती अनन्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: 'Man Udu Udu Jhala' fame Hruta Durgule's first look from Timepass 3 out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.