'मन उडू उडू झालं' मालिकेतील शलाका आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:00 AM2021-09-08T07:00:00+5:302021-09-08T07:00:00+5:30
झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं ही नवीन मालिका नुकतीच दाखल झाली आहे.
झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं ही नवीन मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने दीपाची भूमिका तर अभिनेता अजिंक्य राऊतने इंद्रची भूमिका साकारली आहे. या मालिकेत अरुण कदम, रुपलक्ष्मी चौगुले, पूर्णिमा तळवळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपा अशा तीन मुली दाखवल्या आहेत. या मालिकेत शलाकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची आईदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मन उडू उडू झालं मालिकेत लवकरच शलाका लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.
मात्र शलाकाच्या सासरच्यांकडून त्यांच्या लग्नासाठी नको ती मागणी केली जात आहे. ही मागणी पूर्ण करता करता देशपांडे कुटुंबाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यात आता पिशवीत ठेवलेले पैसे देखील लुटले गेल्याने शलाकाचे लग्न होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. मालिकेत शलाकाचे पात्र थोडेसे घाबरट दाखवले आहे. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीने.
शर्वरी कुलकर्णीने या मालिकेआधी सोनी मराठी वाहिनीवरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यात तिने मीराची भूमिका साकारली होती.
शर्वरी उत्तम डान्सर असून अभिनयाचे तिने धडे गिरवले आहेत. नाटकांमधूनही ती याआधी प्रेक्षकांसमोर आली आहे. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी विभव बोरकर याच्यासोबत लग्न केले आहे.
शर्वरी कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णीची मुलगी आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक मंचावरून तिने सुत्रसंचालिकेची भूमिका देखील बजावली आहे.
गेल्या काही वर्षांपासून संपदा कुलकर्णी नवरा राहुल कुलकर्णी यांच्यासोबत कोकणातील गावी राहत आहे. तिथे ती शेती क्षेत्रात गुंतलेल्या पाहायला मिळत आहेत.
‘आनंदाचं शेत’ या माध्यमातून ती इतरांना देखील शेती व्यवसायात येण्यास प्रोत्साहन देत आहेत.