लॉजिकची माती...बंद करा रे...; ‘मन उडू उडू झालं’चा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:54 IST2022-04-26T17:54:08+5:302022-04-26T17:54:35+5:30
Man Udu Udu Zhala Marathi Serial : मालिका रंजक होण्यासाठी त्यात नवनवे ट्वीस्ट आणले जातात. पण अनेकदा यामुळे मालिका रंजक होण्याऐवजी रटाळ होते. परिणामी प्रेक्षक कंटाळतात. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रेक्षकांची ही नाराजी लपून राहत नाही.

लॉजिकची माती...बंद करा रे...; ‘मन उडू उडू झालं’चा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक
Man Udu Udu Zhala Troll : मालिका रंजक होण्यासाठी त्यात नवनवे ट्वीस्ट आणले जातात. पण अनेकदा यामुळे मालिका रंजक होण्याऐवजी रटाळ होते. परिणामी प्रेक्षक कंटाळतात. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रेक्षकांची ही नाराजी लपून राहत नाही. अनेकदा मालिकांमध्ये काही गोष्टींचा अतिरेक केला जातो. त्यामुळेच प्रेक्षक कंटाळतात. असाच काहीसा प्रकार ‘मन उडू उडू झालं’ ( Man Udu Udu Zhala ) या मालिकेच्या बाबतीत घडला आहे.
सध्या या मालिकेत नवनवे ट्वीस्ट येताना दिसत आहेत. सध्या इंद्रा व दीपूच्या प्रेमाची खबर दीपूच्या आईला लागली आहे आणि ती प्रचंड संतापली आहे. इंद्रा आणि दीपूची प्रेमकहाणी नेमक्या कुठल्या वळणावर जाते, हे येत्या भागांत दिसेलच. पण सध्या या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले आहेत. त्यामुळे मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.
झी मराठीनं नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दीपूची आई मालती लेकीला इंद्रापासून लांब राहण्याचा सल्ला देत आहे. हा प्रोमो समोर येताच प्रेक्षक मालिकेला ट्रोल करत आहेत.
‘ही आत्तापर्यंत झी ची सर्वात फालतू सीरिअल आहे. काय आणि कशाला दाखवतात त्यांना त्यांचंच माहिती,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. लॉजिकची माती, अशा शब्दांत एका युजरने या मालिकेला ट्रोल केलं आहे. ‘सीरिअल बंद करा रे ही’, अशा शब्दांत अन्य एकाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘किती पांचटपणा कराल अजून. आधी किती छान होती सीरिअल आणि आता तर बघू पण वाटत नाही,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. काहीतरी चांगलं दाखवा, अशी विनंती एकाने केली आहे.