Promo : दाखवण्यासाठी काही नाही म्हणून...., ‘मन झालं बाजिंद’चा प्रोमो पाहून भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:04 PM2022-04-17T12:04:12+5:302022-04-17T12:04:40+5:30

Man Jhala Bajind : ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत सध्या एक वेगळं वळण पाहायला मिळतंय. लवकरच मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. पण...

man zala bajind Promo zee marathi serial troll for new entry of dadasaheb | Promo : दाखवण्यासाठी काही नाही म्हणून...., ‘मन झालं बाजिंद’चा प्रोमो पाहून भडकले नेटकरी

Promo : दाखवण्यासाठी काही नाही म्हणून...., ‘मन झालं बाजिंद’चा प्रोमो पाहून भडकले नेटकरी

googlenewsNext

मालिका अधिकाधिक रंजक बनवण्यासाठी त्यात नवंनवे ट्विस्ट आणले जातात. काही ट्विस्ट चाहत्यांना आवडतात. काही मात्र फ्लॉप ठरतात. झी मराठीवरील  (ZEE MArathi) ‘मन झालं बाजिंद’ (Man Jhala Bajind) या मालिकेत सध्या एक वेगळं वळण पाहायला मिळतंय. लवकरच मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. होय,‘मन झालं बाजिंद’मध्ये आता दादासाहेबांची एन्ट्री होणार आहे.

झी मराठीने नुकताच याचा प्रोमो नुकताच रिलीज केला. यात दादासाहेबांची एक झलक पाहायला मिळतेय. यावरून मालिकेत लवकरच दादासाहेब येणार, हे स्पष्ट झालंय. पण ही नवी एन्ट्री म्हणा वा हा नवा ट्विस्ट म्हणा प्रेक्षकांना फार काही आवडल्याचं दिसत नाही. होय, ताज्या प्रोमोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच वाटतंय.

कृष्णा फुई आजीला दादासाहेबांच्या स्वभावाविषयी विचारते. यावर फुई आजी दादासाहेबांबद्दल भरभरून बोलताना दिसतात. आता हे दादासाहेब कोण तर? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. कारण  आजपर्यंत या दादासाहेबांचे नावही विधात्यांच्या घरात नव्हते.  पण आता चक्क त्यांची आज एंट्री होणार आहे. हे दादासाहेब म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून रायाचे आजोबा आणि भाऊसाहेब विधाते यांचे वडील आहेत. पण या पात्राची एन्ट्री प्रेक्षकांना फारसी रूचली नसल्याचं चित्र आहे.

यावरून नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ‘आता काहीच राहिलं नाही स्टोरीमध्ये म्हणून न्यू एन्ट्री. आम्ही आधी खूप आवडीने मालिका बघायचो. पण आता चार्म गेला. सगळं ओढून ताणून  सीरिअल खेचायची चाललंय,’अशा शब्दांत एका नेटकऱ्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘दाखवण्यासाठी काही नाही म्हणून मग न्यू एन्ट्री... पण आयडिया जुन्या झाल्यात,’अशी कमेंट अन्य एका नेटकऱ्याने केली आहे. ‘बकवास से भी ज्यादा बकवास सीरिअल’, अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. अन्य एका युजरने तर ‘करा बंद ही बकवास सीरिअल’, अशा शब्दांत मालिकेला ट्रोल केलंय.

 

Web Title: man zala bajind Promo zee marathi serial troll for new entry of dadasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.