केसरी नंदनच्या सेटवर ब्रेकमध्ये गिरवतात कुस्तीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 06:30 AM2019-01-25T06:30:00+5:302019-01-25T06:30:00+5:30
कलर्सचा सध्या चालू असलेली मालिका केसरी नंदन या मालिकेत वडील-मुलगी यांचे नाते, आईचे प्रेम आणि भावाने निरपेक्ष भावनेने बहिणीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी केलेली मदत यावर भाष्य करण्यात आले.
कलर्सचा सध्या चालू असलेली मालिका केसरी नंदन या मालिकेत वडील-मुलगी यांचे नाते, आईचे प्रेम आणि भावाने निरपेक्ष भावनेने बहिणीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी केलेली मदत यावर भाष्य करण्यात आले. केसरीचे मध्यवर्ती पात्र साकारले आहे चाहत तेवानीने. केसरी मोठे स्वप्न बघण्याचे धाडस करत आहे आणि तिला तिच्या वडीलांचा हनुमत सिंग (मानव गोहिल) यांचा कुस्तीचा वारसा पुढे न्यायचा आहे.
ही वडील-मुलीची जोडी कुस्तीचे कठोर प्रशिक्षण घेत आहेत आणि हा खेळ खेळण्याचा आनंद लुटत आहेत. नुकतेच त्या दोघांनी कॅमेऱ्याच्या मागे काही वेळ एकत्र घालविला. मानव चाहतला कुस्ती मध्ये त्यांच्या मोकळ्या वेळात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रीकरणासाठी आमगाव मध्ये रहात असल्यामुळे या संपूर्ण काळात कुटुंबा पासून लांब राहिल्यामुळे मानव चाहतला स्वतःच्या मुलीसारखे वागवत आहेत. त्या दोघांमध्ये कुस्तीचे प्रेम निर्माण झाले आहे. आणि ते नेहमी कुस्तीचे व्हिडिओ शो मध्ये येणाऱ्या चालींसाठी पहात रहातात.
सेट वरील या सर्व क्षणां विषयी बोलताना मानवने सांगीतले, “चाहत ही एक चौकस लहान मुलगी आहे जी काहीतरी इच्छा मनात धरून रोज सेटवर येते आणि तिला काहीतरी नवीन शिकायचे असते. अशा प्रकारच्या हुशारीला चांगले पैलू पाडले गेले पाहिजेत. माझ्या परीने मी तिला अजून चांगली बनण्याचे आव्हान देतो. तर दुसऱ्या दिवशी तिला सर्वस्व पणाला लावून माझ्याशी कुस्ती खेळण्याचा प्रयत्न करताना पाहणे मजेदार वाटते. तिची ही समर्पित भावना मला खूप आवडली आणि मी देशातील इतर मुलींना चाहत प्रमाणे खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतो.”