मनवीर गुर्जर बनला सेलिब्रिटी... फॅन्सने लावले होर्डिंग्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 04:47 PM2017-01-12T16:47:35+5:302017-01-12T16:49:58+5:30
बिग बॉस सिझनमध्ये ‘इंडियावाले’ या गटात एंट्री करणारा मनवीर गुर्जर सध्या ‘सातवे आसमान पे’ आहे. बिग बॉसमुळे सेलिब्रिटी झालेल्या ...
ब ग बॉस सिझनमध्ये ‘इंडियावाले’ या गटात एंट्री करणारा मनवीर गुर्जर सध्या ‘सातवे आसमान पे’ आहे. बिग बॉसमुळे सेलिब्रिटी झालेल्या मनवीरने केवळ शोमध्येच आघाडी घेतली नाही तर, त्याच्या नावाचा सध्या सर्वदूर डंका वाजविला जात आहे. त्याच्या फॅन्सकडून जागोजागी त्याचे होर्डिंग्ज लावले असून, ‘वोट फॉर मनवीर’ असा प्रचारही केला जात आहे.
बिग बॉस सिझन-१० च्या ग्रॅण्डफिनालेचे तिकीट मिळविलेल्या मनवीर गुर्जर याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास प्रेक्षकांना भरपूर भावला आहे. त्यामुळेच तो सध्या प्रसिद्धीझोतात आहे. जेव्हा तो मुंबईच्या ‘इनआॅर्बिट मॉल’मध्ये वोट मागण्यासाठी लोकांमध्ये गेला, तेव्हा लोक त्याच्याकडे ज्या पद्धतीने आकर्षित झाले त्यावरून तो विनिगच्या ताजचा किती जवळ पोहचला आहे हे स्पष्ट होते. काही फॅन्स तर चक्क रॅली काढून त्याचा प्रचार करीत आहेत, तर काहींनी त्याच्या फोटोंचे होर्डिंग्ज लावले आहेत.
विशेष म्हणजे बिग बॉस सिझन -९ चा विनर प्रिंस नरूला यानेही नुकतेच मनवीरच्या समर्थनार्थ वक्तव्य केले असून, तो खूप एंटरटेनिंग असल्याने तोच विजेता ठरेल असे म्हटले आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉँग स्पर्धक आणि मनवीरचा सर्वांत जीवलग मित्र मनू पंजाबी हा या सिझनच्या विजेता यादीत मनवीरच्या तुलनेत आघाडीवर होता. मात्र ‘टिकट टू फिनाले टास्क’मध्ये मनवीरने त्याला धोबीपछाड देत फिनालेचे तिकीट मिळवल्याने त्याचा भ्रमनिरास झाला आहे. अर्थात याचा फैसला २८ जानेवारी होईल.
मात्र मनवीरच्या फॅन्ससाठी तोच या सिझनचा विजेता असल्याने त्याच्या प्रचारासाठी कुठल्याच प्रकारची कसर सोडली जात नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीच्या कानाकोपºयात त्याच्या नावाचे होर्डिंग्ज लावले जात आहेत. त्याच्या प्रचारासाठी अखिल भारतीय गुर्जर महासभाही मैदानात उतरल्याने मनवीरचा प्रचार युद्धपातळीवर सुरू आहे.
या शोच्या सुरुवातीला मनवीर गुर्जर याच्याकडे ‘रांगडा गडी’ असे बघितले जात होते. मात्र ज्या पद्धतीने त्याने स्वत:ला घरात सावरले त्यावरून तो सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. आता तर मनू पंजाबी याच्यापेक्षा सर्वाधिक समजुतदार सदस्य म्हणून त्याच्याकडे बघितले जात आहे. त्यामुळेच कदाचित तो प्रेक्षकांच्या पसंतीचा स्पर्धक बनला आहे.