मी वाईट माणूस नाही, तुम्हा सगळ्यांचे पैसे देईन; शर्मिष्ठा राऊतच्या आरोपानंतर मंदार देवस्थळींची कळकळीची विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 03:08 PM2021-02-22T15:08:27+5:302021-02-23T12:46:34+5:30
Mandar devasthali share emotional post on instagram : आपल्यावर झालेल्या आरोपांवर मंदार देवस्थळी यांनी मौनं सोडतं सोशल मीडियावर आपली बाजू मांडत पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर ने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. कृपया बोला, घाबरू नका, असेही तिने म्हटले आहे. ‘हे मन बावरे’ या मालिकेत सध्या शर्मिष्ठा काम करतेय. निर्मात्याने याच मालिकेचे पैसे थकवल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान मृणाल दुसानीस, संग्राम साळवी , विदिशा म्हसकर या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठा पाठिंबा दिला आहे. त्यांचेही पैसे थकवल्याचा आरोपही या कलाकारांनी निर्मात्यांवर केला आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांवर मंदार देवस्थळी यांनी मौनं सोडतं सोशल मीडियावर आपली बाजू मांडत पोस्ट शेअर केली आहे. लोकमतशी बोलताना ते म्हणाले, ''मी पैसे परत देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. मला कुणाचे पैसे घेऊन कुठे जायचं नाहीयं. माझी परिस्थिती सध्या खूप बिकट आहे त्यामुळे मी काही करु शकतं नाहीय. माझा त्यांचे पैसे बुडवण्याचा कोणताच हेतू नाहीय.''
मंदार देवस्थळ यांची पोस्ट
नमस्कार मी अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांच payment थकलं आहे. तुमच म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, पण मी सुद्धा सध्या अत्यंत आर्थिक बिकट परिस्थिती मधून जात आहे., मला खूप loss झाला आहे, त्यामुळे आत्ता पैसे देण्याची माझी खरच परिस्थिती नाही पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन अगदी टॅक्स सकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे, कोणाचेत पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही तशी माझी इच्छा ही नाही, पण आता माझ्यावर सुद्धा आर्थिक सकंट कोसळलय, मी खरच वाईट माणूस नाही माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढण्ययाचा प्रयत्न करतोय, देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना...आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो. अशा शब्दात त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
शर्मिष्ठा राऊतची पोस्ट
आम्ही कलाकार चॅनल कोणतही असो, निर्माता कोणीही असो आम्ही कलाकार नेहमीच आमच्याकडून चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करूनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे, योग्य आहे? अनेक वेळा अस होत की, आपण खूप प्रामाणिकपणे आपले काम(शूटींग) करतो. आपल प्रोजेक्ट हे आपल बाळ आहे आणि प्रॉडक्शन हाऊस हे आपल घर अस समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रॉडक्शन हाऊसकडून न मिळणाºया गोष्टींशी, प्रॉडक्शन हाऊसच्या मिसमॅनेजमेंटशी तडजोड करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात. चॅनलचा उत्तम सपोर्ट असूनही निर्माता कामाचा योग्य तो मोबदला देत नाहीत. अनेक कारणं वारंवार मिळत असतात...आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला या तत्त्वाअंतर्गत काम करत असतो. मग वेळच्या वेळी चॅनलकडून पैसे येऊन पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळण हे योग्य आहे का? कलर्स मराठीने आम्हा कलाकारांना, तंत्रज्ञानांना वेळोवेळी पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली. परंतु आमच्या निर्मात्याने कोणालाही पैसे दिले नाही... निर्मात्याच्या अडिअडचणींच्या वेळेस, एपिसोडची बँक नाही म्हणून किंवा कधी कधी निर्मात्यांकडे कॉस्च्युम्स नाही म्हणून घरून आपले कॉस्च्युम्स आणून शूटींगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मदत करणे आता चूक आहे का? आपल्याच मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भिक मागितल्यासारखा सतत मागत राहणे हे योग्य आहे का? असा सवाल शर्मिष्ठाने केला आहे.
मंदार देवस्थळी हे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. मंदार देवस्थळी यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. यामध्ये बोक्या सातबंडे, आपली माणसं, झुंज, आभाळमाया, किमयागार, वसुधा, वादळवाट, अवघाची संसार, होणार सून मी या घरची, माझे पती सौभाग्यवती अशा मालिकांचा समावेश आहे.