Maniesh Paul : पापा की परी इतनी बडी हो गई! पहिल्यांदा लेकीसोबत दिसला मनीष पॉल, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 11:58 AM2022-09-02T11:58:00+5:302022-09-02T11:59:37+5:30

Maniesh Paul daughter Saisha Paul Video : मनीषचा त्याच्या लेकीसोबतचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मनीष त्याची लेक सायशासोबत दिसतोय.

maniesh paul daughter saisha paul video viral | Maniesh Paul : पापा की परी इतनी बडी हो गई! पहिल्यांदा लेकीसोबत दिसला मनीष पॉल, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले...

Maniesh Paul : पापा की परी इतनी बडी हो गई! पहिल्यांदा लेकीसोबत दिसला मनीष पॉल, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले...

googlenewsNext

Maniesh Paul daughter Saisha Paul Video : मनीष पॉल (Maniesh Paul ) हा टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. होस्ट म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तो इंडस्ट्रीचा नंबर 1 चा होस्ट आहे. केवळ इतकंच नाही तर अभिनेता म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात मनीषने साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं. पण सध्या चर्चा मनीष पॉलची नाही तर त्याच्या लेकीची आहे. होय, मनीष पॉलची लेक इतकी मोठी झालीये, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये.

सध्या मनीषचा त्याच्या लेकीसोबतचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मनीष त्याची लेक सायशासोबत दिसतोय. मनीष कुणाशी तरी बोलतो आणि नंतर सायशाचा हात पकडून चालायला लागतो.  हा व्हिडीओ समोर येताच, मनीषचे फॅन्स क्रेझी झाले आहेत.

मनीषला इतकी मोठी लेक आहे, यावर अनेकांना विश्वास बसला नाही. मला वाटलं, ही त्याची बहीण असेल, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. अनेकांनी सायशाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. मनीषला मुलगी आहे आणि ती सुद्धा इतकी मोठी, सुंदर, अशी कमेंट एका युजरने केली. काहींनी यावरून मनीषची मजाही घेतली. मनीषचा बालविवाह झाला होता का? अशा मजेशीर कमेंट अनेकांनी केल्या.

मनीषने 2007 मध्ये त्याची शाळेतील मैत्रिण संयुक्तासोबत लग्न केलं. संयुक्ता आणि मनीष एकाच शाळेत शिकत होते. तिथून त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली. 1998 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. पण करिअर मार्गी लागल्यावरच लग्न करायचं असा दोघांचाही निर्णय होता. अखेर मनीषची करिअरची गाडी रुळावर आली आणि त्याने संयुक्ताशी लग्न थाटलं.. या दाम्पत्याला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.  

संघर्षाच्या काळात संयुक्ता मनीषच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. एकदा मनीष याबद्दल बोलला होता. ‘माझी पत्नी माझा आदर्श आहे. आज मी जे काही आहे, ते तिच्यामुळे. लग्नानंतर घराची संपूर्ण जबाबदारी तिने स्वत:च्या खांद्यावर घेतली. जेणेकरून मी माझे करिअर करू शकेल,’ असे तो म्हणाला होता.

 

Web Title: maniesh paul daughter saisha paul video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.