खूब लडी मर्दानी...झांसी की रानी मालिकेत पाहायला मिळणार भव्य विवाह सोहळा, असा असणार थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 08:00 AM2019-04-26T08:00:00+5:302019-04-26T08:00:00+5:30

खूब लडी मर्दानी...झांसी की रानी मालिकेत मनकर्णिक आणि गंगाधर यांनी परिधान केलेल्या दागिन्यांची किंमत सात आकडी असणार आहे आणि त्यांचे वजन प्रत्येकी 4-5 किलो इतके असणार आहे.

Manikarnika and Gangadhar’s grand wedding in Khoob Ladi Mardaani…Jhansi Ki Rani | खूब लडी मर्दानी...झांसी की रानी मालिकेत पाहायला मिळणार भव्य विवाह सोहळा, असा असणार थाट

खूब लडी मर्दानी...झांसी की रानी मालिकेत पाहायला मिळणार भव्य विवाह सोहळा, असा असणार थाट

googlenewsNext

विवाह सोहळा म्हटले की सगळं काही भव्य दिव्य असते. भारदस्त दागदागिन्यांनी नटलेले नवरेदव नवरी.त्यात लक्ष वेधून घेणारे आकर्षक पेहराव त्यामुळे सा-यांसाठी विवाहसोहळा हा खास असतो. सर्वत्र सध्या सगळीकडे लगीनघाई सुरू आहे. छोट्या पडद्यावरही लगीनघाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कलर्सच्या 'खूब लडी मर्दानी झांसी की रानी 'मध्ये मनकर्णिकेचा गंगाधरशी होणारा विवाह राजेशाही थाटात असणार आहे आणि त्याची तयारी आता अतिशय जोरात सुरू झाली आहे आणि ही जोडी अतिशय उत्कृष्ट पोशाखात दिसणार आहेत. 

 

सारे काही भव्यदिव्य असणा-या या मालिकेतील हा विवाह सोहळाही  खास असणार आहे. मालिकेची टीम प्रत्येक गोष्टीवर सध्या बारकाईने लक्ष घालत खूप मेहनत घेत आहे. नववधु मनकर्णिका एक पारंपारिक साडीत दिसणार आहे आणि त्यावर भारदस्त दागिने असणार आहेत.

प्राचीन काळातील दागिने लक्षात घेऊन हे दागिने घडविले गेले आहेत. या दागिन्यांमध्ये पोलकी, मोती, माणिक आणि पाचू असणार आहेत आणि ते अति सुंदर चोकर आणि राणी हारात गुंफलेले आहेत. या शो मध्ये दाखविल्या जाणाऱ्या दागिन्यांची किंमत सात आकडी असणार आहे आणि त्यांचे वजन प्रत्येकी 4-5 किलो इतके असणार आहे.


 
मनकर्णिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सेन म्हणाली, “प्रत्येक मुलीचे तिच्या लग्नाच्या दिवशी कसे दिसावे याचे काही स्वप्न असते. मनकर्णिकेचा राजेशाही थाट तिच्या पोशाखात आणि तिच्या विवाहाच्या भव्यतेमध्ये नक्कीच भर टाकरणार आहे. घातलेले दागिने प्राचीन काळातील कलाकुसरीचे असणार आहेत.

माझ्या मनगटाची शोभा वाढविणाऱ्या बांगड्यांची घडणावळ अतिशय सुंदर आहे आणि त्यातून मनकर्णिकेचा विवाहाचा थाट हा डोळे दिपवणारा असणार हे मात्र नक्की. राजघराण्याचे प्रतिक असलेला नेकलेस अतिशय सुंदररित्या पोलकी, मोती आणि माणकाने घडवलेला आहे. अशा प्रकारचे सेट घालणे हे एक स्वप्नच आहे आणि ते सत्यात उतरले आहे.”


 

Web Title: Manikarnika and Gangadhar’s grand wedding in Khoob Ladi Mardaani…Jhansi Ki Rani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.