झुबेर खान स्वत:च आपले करतो स्टंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 08:30 PM2019-05-08T20:30:00+5:302019-05-08T20:30:00+5:30

‘झी टीव्ही’वरील ‘मनमोहिनी’च्या कथानकाचा काळ पुढे नेल्यावर त्यातील अमानवी शक्तीची भूमिका साकारणाऱ्या झुबेर के. खानच्या अभिनयाबद्दल त्याची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे

Manmohini star Zuber K Khan does his own stunts | झुबेर खान स्वत:च आपले करतो स्टंट!

झुबेर खान स्वत:च आपले करतो स्टंट!

googlenewsNext
ठळक मुद्दे झुबेरन मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेतले आहे

झी टीव्ही’वरील ‘मनमोहिनी’च्या कथानकाचा काळ पुढे नेल्यावर त्यातील अमानवी शक्तीची भूमिका साकारणाऱ्या झुबेर के. खानच्या अभिनयाबद्दल त्याची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे. या भूमिकेची विविध अंगे अनुभविण्यासाठी त्यातील सर्व स्टंट प्रसंग स्वत:च साकारण्याचा निर्णय झुबेर खानने घेतला आहे.

झुबेर खानला जेव्हा कळले की त्याच्या वनराज या अतिमानवी व्यक्तिरेखेला हवेत उडी मारणे, उलटी उडी मारणे, वायर फ्ल्यू वगैरेसारखे बरेच स्टंट प्रसंग साकारावे लागतील, तेव्हा त्याने हे सर्व स्टंट प्रसंग स्वत:च साकार करण्याचा निर्णय टीमला कळविला. या स्टंट प्रसंगांच्या चित्रीकरणाला प्रारंभ होण्यापूर्वी सुरक्षेचे आणि खबरदारीचे सर्व उपाय योजले गेले आहेत ना, याची ही टीम खातरजमा करून घेते. झुबेरने मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेतले असल्याने त्याला हे स्टंट प्रसंग विनासायास साकारता येतील, याची या टीमला खात्री होती.

झुबेर खान म्हणाला, “मी गेली दोन वर्षं मार्शल आर्टसचं प्रशिक्षण घेत असल्याने त्या अनुभवाचा उपयोग मला हे स्टंट आणि अ‍ॅक्शन प्रसंग साकारताना झाला. माझ्यावरील स्टंट प्रसंगांसाठी स्टंटमॅनला गुंतविणं मला योग्य वाटत नाही. दुसरं असं की हे स्टंट प्रसंग साकारताना माझ्या अंगात चैतन्य सळसळतं आणि दरवेळी अधिक चांगली भूमिका रंगविण्याचा आत्मविश्वासही मिळतो. यात मी अर्धा मानव आणि अर्धा सिंह असलेल्या वनराजची भूमिका साकारीत आहे. या व्यक्तिरेखेमुळे मला जवळपास प्रत्येक प्रसंगातच स्टंट साकारावे लागत आहेत. मी केवळ मार्शल आर्टसचंच प्रशिक्षण घेतलं आहे, असं नव्हे, तर मी घोडेस्वारीही आणि नृत्यही शिकलो आहे. त्यामुळे मला अवघड स्टंट प्रसंगही साकारताना फार अडचण येत नाही. आपल्या प्रशिक्षणाचा असा व्यवहारी उपयोग होताना पाहून मनाला समाधान लाभतं.”
क्या बात है, झुबेर! 

मालिकेच्या आगामी भागांत दिसेल की सियाला (गरिमासिंह राठोड) ठार मारण्यासाठी मोहिनी (रेहना पंडित) एका पूजेचे आयोजन करील आणि त्यास गावातील सर्व महिला आणि सियाचे सर्व कुटुंबीय उपस्थित राहतील. यावेळी मनमोहिनी आपली योजना लागू करते ज्यामुळे राम (अंकित सिवच) सियासमोर येत नाही आणि त्यामुळे तो आपली गेलेली स्मृती परत मिळवीत नाही. त्यामुळे तो मनमोहिनीच्या प्रभावाखालीच राहतो. राम आणि सियाला वेगवेगळे ठेवण्यात मनमोहिनी यशस्वी ठरेल काय?

Web Title: Manmohini star Zuber K Khan does his own stunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.