‘मन झालं बाजिंद’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर 'बाजिंद' शब्द होतोय ट्रेंड, Google वर शोधला जातोय अर्थ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 10:53 IST2021-08-04T10:53:09+5:302021-08-04T10:53:28+5:30
‘बाजिंद अर्थ’, ‘बाजिंद Meaning’, ‘बाजिंदचा अर्थ’, ‘बाजिंद म्हणजे काय?’, ‘बाजिंदी अर्थ’ या टर्म्स गुगल सर्चच्या ट्रेण्डमध्ये दिसून येत आहेत.

‘मन झालं बाजिंद’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर 'बाजिंद' शब्द होतोय ट्रेंड, Google वर शोधला जातोय अर्थ ?
पिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीक. हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. याच रंगाची उधळण करत झी मराठी वाहिनीवर ‘मन झालं बाजिंद’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. वाहिनीवर या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे.
या मालिकेचा प्रोमो पाहून आणि नाव ऐकून बाजिंद म्हणजे काय हा प्रश्न तमाम प्रेक्षकांना पडला आहे. प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक गुगलवर ‘बाजिंद’ शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘बाजिंद अर्थ’, ‘बाजिंद Meaning’, ‘बाजिंदचा अर्थ’, ‘बाजिंद म्हणजे काय?’, ‘बाजिंदी अर्थ’ हे गुगल सर्चच्या ट्रेण्डमध्ये दिसून येत आहेत. मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर बाजिंद या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यात रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावरही याच शब्दाचा अर्थावरुन चर्चाही रंगल्या आहेत.
मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे.पिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीक. हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे.
परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे. या नायकाची बाजिन्दा हा शब्द वापरण्यात आला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे. ही मालिका २३ ऑगस्ट पासून रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.