'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्याच्या आईचं निधन, शेअर केली भावनिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 11:13 AM2022-07-29T11:13:59+5:302022-07-29T11:14:55+5:30
Man Udu Udu Jhala: 'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्याने इंस्टाग्रामवर आईसोबतचे फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.
झी मराठीवरील मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत नुकतेच दिपू आणि इंद्राचे लग्न झाले आहे. सानिका आणि कार्तिकला वठणीवर आणल्यानंतर ही मालिका ऑफ एअर जाणार आहे. या मालिकेने आणि कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. नयन कानविंदेची भूमिका अभिनेता अमित परब(Amit Parab)ने साकारले होते. अमित परबच्या आईचे २० जुलै २०२२ रोजी निधन झाले आहे. त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
अमित परबने इंस्टाग्रामवर आईसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईचे नुकसान नेहमीच दुःखद आणि पोकळी भरून न येणारी असते. तू दिलेले विचार माझ्यात कायमच राहतील. तू मला गेल्या २८ वर्षात शिकवलेल्या मूल्ये आणि नितीमत्तेमुळे. तू खरी लढाऊ आहेस आणि तू मला तसे व्हायला शिकवले आहेस. हे सगळे सोप्पे होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मी फक्त देवाच्या इच्छेला सहमती दिली कारण त्याने मला खात्री दिली की त्याने तुझ्यासाठी दुसर्या बाजूने आणखी चांगल्या गोष्टींची योजना आखली आहे. ते माझ्यासाठी स्वार्थाचे ठरले असते जर मी तुला तुझ्या भल्यासाठी जाऊ दिले नसते.
त्याने पुढे म्हटले की, मला आनंद आहे की मी काहीतरी बनून दाखवले. आता मी तुझ्या पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत असणार नाही. म्हणून कृपया स्वतःची काळजी घे आणि पुरेसा आराम कर. मी माझ्या पुढच्या जन्मातही माझी आई म्हणून पुन्हा भेटण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे आणि मी पुन्हा तुझ्या गर्भात येण्याची आणि तो क्षण अनुभवण्याची वाट पाहतो. तोपर्यंत कृपया विश्रांती घे. तुझ्या सोनूकडून खूप खूप प्रेम.
अमित एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. अभिनयाची आवड असल्याने त्याने या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यात त्याचे सिलेक्शन झाले होते. नयनरावांच्या भूमिकेमुळे अमितला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. काही दिवसांपूर्वीच अमितने मन उडू उडू झालं मालिकेचे शूटिंग पूर्ण करून सोशल मीडियावर प्रेक्षकांना निरोप देत एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या मालिकेमुळे मला खूप लोकप्रियता मिळाली असे त्याने म्हटले होते.