मनोज जोशी माझ्यासाठी वडिलांसारखेच - करणवीर शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 07:15 IST2018-10-27T18:01:09+5:302018-10-29T07:15:00+5:30
सोनी सबवर लवकरच 'मंगलम दंगलम' ही मालिका दाखल होणार आहे.

मनोज जोशी माझ्यासाठी वडिलांसारखेच - करणवीर शर्मा
सोनी सबवर लवकरच 'मंगलम दंगलम' ही मालिका दाखल होणार आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका अभिनेता करणवीर शर्मा साकारतो आहे. या मालिकेत करणवीरसोबत अभिनेता मनोज जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मनोज जोशी सर माझ्यासाठी वडिलांसारखे असल्याचे करणवीर सांगतो.
या मालिकेतील भूमिकेबाबत करणवीरने सांगितले की, 'मी एका दक्षिण भारतीय व्यक्तीची भूमिका साकारत आहे. मी पंजाबी असल्यामुळे मला या बोलीभाषेचे प्रशिक्षण घ्यावे लागले. जमेची बाजू म्हणजे अर्जुन हा पारंपरिक दक्षिण भारतीय नाही. तो एक वकील आहे, ज्याला खोटे बोलणे आवडत नाही आणि ही मालिकेतील एकमेव समजूतदार व्यक्ती आहे. त्याची नैतिकता उच्च आहे आणि त्याने हे गुण त्याच्या आईकडून मिळवले आहेत. तो अत्याधुनिक असून आजच्या पिढीला शोभेल असा आहे. दक्षिण भारतात जन्म, इंदौरमध्ये पालन-पोषण आणि शुद्ध हिंदी बोलणारा अर्जुन हा पारंपरिक वृत्तीचा नाही. तो एक उत्साही व्यक्ती आहे.'
करणवीरने मनोज जोशी यांच्याबद्दल सांगितले की, 'मनोज जोशी यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला वाटले की ते अत्यंत गंभीर स्वभावाचे आहेत. कदाचित ते माझ्या सासऱ्याची भूमिका साकारत असल्यामुळे मला त्यांच्यासोबत आरामदायी वाटावे, अशी त्यांची इच्छा नसावी. पण आता मी त्यांना ओळखू लागलो असल्याने मला वाटते ते माझ्यासाठी वडिलांसारखेच आहेत. ते मला सल्लादेखील देतात. ते मनाने खूप मोठे आहेत.'
'मंगलम दंगलम' ही गडबड गोंधळाने परिपूर्ण अशी ही हसवाहसवी म्हणजे प्रियाराधन करणारा एक तरुण त्याच्या होणा-या सासरेबुवांना जिंकेल अशा आशेमधला प्रवास आहे. या मालिकेमध्ये मनोज जोशी, शुभा खोटे यांसारखे उत्तम कलाकार आहेत.