'महाराष्ट्रचा फेवरेट कोण २०१९'मध्ये पाहायला मिळणार मानसी नाईकच्या डान्सचा जलवा!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 16:48 IST2020-01-09T16:41:16+5:302020-01-09T16:48:24+5:30
सिनेमातील 'एक दिल' या गाण्यांवर तिने आपला नृत्याविष्कार सादर केला.

'महाराष्ट्रचा फेवरेट कोण २०१९'मध्ये पाहायला मिळणार मानसी नाईकच्या डान्सचा जलवा!!!
महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा मराठी कलाक्षेत्रातील सर्वांत मोठा सोहळा आहे. 'झी टॉकीज' दरवर्षी हा धमाकेदार कार्यक्रम आयोजित करते. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी एकत्र जमतात. प्रेक्षकांच्या पसंतीने विजेत्यांची निवड करणारा, हा मराठीतील नंबर वन पुरस्कार सोहळा, सर्वांचाच अतिशय आवडीचा आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९' सुद्धा याला अपवाद नव्हता.
'रेड कार्पेट'वर अनेक तारेतारका अवतरल्या होत्या. दमदार परफॉर्मन्सने भरलेला हा सोहळा, म्हणजे मनोरंजनाचा जबरदस्त धमाका असतो. याच दिमाखदार सोहळ्यातील एक मुख्य आकर्षण ठरले, ते म्हणजे गोड आणि बोल्ड अभिनेत्री मानसी नाईक, हिचा डान्स परफॉर्मन्स! टकाटक या मराठी सिनेमातील 'ये चंद्राला' आणि 'पद्मावत' सिनेमातील 'एक दिल' या गाण्यांवर तिने आपला नृत्याविष्कार सादर केला. मानसीच्या दिलखेचक अदांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते. दमदार परफॉर्मन्स देणारी ही अदाकारा, तिच्या 'ब्लॅक आऊटफिट'मध्ये अधिकच आकर्षक दिसत होती. बहारदार नृत्य सादर करण्याआधीच, आपल्या 'हॉट लूक'च्या जोरावर तिने सगळ्यांना प्रभावित केले.