नि:शब्द! विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला-"डोळ्यातलं पाणी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:34 IST2025-02-16T13:30:23+5:302025-02-16T13:34:48+5:30
'छावा' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे.

नि:शब्द! विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला-"डोळ्यातलं पाणी..."
Abhijeet Chavan: 'छावा' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिकेत पाहायला मिळते आहे. या चित्रपटाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सध्या सगळेजण 'छावा' पाहिल्यावरचा सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत.
लोकप्रिय मराठी अभिनेता अभिजीत चव्हाणनेसुद्धा 'छावा' सिनेमा नुकताच पाहिला. हा चित्रपट पाहिल्यावर अभिनेत्याने टीमचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने दिग्दर्शक व निर्मात्यांचे आवर्जून आभार मानले आहेत. ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत अभिनेत्याने लिहिलंय, "मध्यरात्री चित्रपट संपला, 'छावा' कादंबरी संपवल्यानंतर जी छिन्न अवस्था होते तशाच अवस्थेत बाहेर पडलो .गाडी काढेपर्यंत डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. हे क्षण खूप दुर्मिळ असतात. या क्षणांसाठी लक्ष्मण उतेकर सर तुमचा आभारी आहे. मराठ्यांचा धगधगता ज्वलंत इतिहास आजवर दडपला गेला जाणूनबुजून बदलला गेला त्यात शंभूराजांसाखे खरे धर्मवीर होरपळले गेले तो इतिहास तितक्याच भव्यतेने सर तुम्ही रजतपटावर आणून आम्हाला उपकृत केलंत. मी समीक्षक नाही पण जे भिडलं ते आणि तसंच लिहितोय."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय की, "विकी कौशलने 'छावा' साकारताना प्राण ओतलेय तीच अवस्था अक्षय खन्ना औरंगजेब साकारताना नि:शब्द ए आर रहमानच संगीत सोडल्यास चित्रपटाने कहर केलाय. माझ्या लाडक्या संत्या संतोष जुवेकरचं काम त्याच्यासारखंच देखणं यांची दृश्य बघताना अक्षरशः चेव चढतो नकळत हाताच्या मुठी आवळल्या जातात दात ओठ चावले जातात इतका जबरदस्त परिणाम साधतो चित्रपट सगळ्या टीम चे आभार आम्हाला संपूर्ण अनुभव देण्यासाठी चित्रपट सगळे रेकॉर्डस् मोडेल यात शंकाच नाही. आवर्जून बघा, ओटीटी वर येण्याची वाट बघू नका चित्रपटगृहात जाऊन बघा आणि संगरात न्हाऊन जा. जय शिवराय, हर हर महादेव...!" अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे.