मराठी अभिनेत्याला पडली 'जवान'ची भुरळ; हटके डान्स करत दिली शाहरुखला टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 14:41 IST2023-10-18T14:39:33+5:302023-10-18T14:41:31+5:30
Ajinkya raut: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अजिंक्यने नुकताच त्याचा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्याला पडली 'जवान'ची भुरळ; हटके डान्स करत दिली शाहरुखला टक्कर
बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. किंबहुना आजही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे. या सिनेमातील प्रत्येक गाणं सुपरहिट झालं असून त्यातील चलेया या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रिल्स केले. विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता अजिंक्य राऊत यालादेखील या गाण्यावर ताल धरण्याचा मोह आवरला नाही. त्याने सुद्धा या गाण्यावर रील केलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अजिंक्यने नुकताच त्याचा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने जवान सिनेमातील चलेया या गाण्यावर ताल धरला आहे. सोबतच शाहरुखच्या गाण्यातील हुक स्टेपही केली आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ पोस्ट करत मी असे मजेशीर रिल्स करत जाऊ का? असा प्रश्न त्याने कॅप्शनमध्ये विचारला आहे. त्याच्या या प्रश्नावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. अजिंक्यने विठू माऊली, मन उडू उडू झालं यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं असून सध्या तो अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत काम करत आहे.