'आम्ही रिलेशनमध्ये नाही, त्या फक्त अफवा'; रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:03 AM2023-12-07T09:03:03+5:302023-12-07T09:03:32+5:30

Akshay kothare: 'त्या' फोटोनंतर सुरु झाली अक्षय-रेश्माच्या अफेअरची चर्चा

marathi actor akshar-kothari-said-the-truth-behind-rumors-of-his-relationship-with-reshma-shinde | 'आम्ही रिलेशनमध्ये नाही, त्या फक्त अफवा'; रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण

'आम्ही रिलेशनमध्ये नाही, त्या फक्त अफवा'; रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण

कलाविश्वात सेलिब्रिटींशी निगडीत अनेक चर्चा सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा त्यांच्या अफेअर, ब्रेकअप याविषयीच्या चर्चा होतात. गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे (reshma shinde) आणि अक्षय कोठारे (akshay kothare) एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या चर्चांवर अक्षयने स्पष्टीकरण दिलं आहे.

'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत अद्वैत चांदेकर ही भूमिका साकारत असून त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. अल्ट्रा मराठी बझ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने रेश्मा आणि माझ्या रिलेशनशीपविषयी सुरु असलेल्या चर्चा केवळ अफवा आहेत असं म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.

"तुझ्याविषयी ऐकलेली अफवा कोणती? असा प्रश्न अक्षयला विचारण्यात आला. त्यावर, मी आणि रेश्मा रिलेशनशीपमध्ये आहोत ही.. पण, असं अजिबात नाहीये. मला माहित नाही ही अफवा कशी काय तयार झाली. मात्र, मला एक आठवतंय स्वाभिमान मालिका सुरु असताना प्रश्नोत्तरांचं एक सेशन घेतलं होतं. तेव्हा मी विचारलं होतं की माझ्याविषयी कोणती अफवा आहे का? त्यावर एका चाहत्याने सांगितलं होतं की, तू आणि रेश्मा रिलेशनशीपमध्ये आहात. चाहत्याच्या या वाक्यावर मी स्टोरी शेअर करत एक गाणंही टाकलं होतं", असं अक्षय म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना’ या गाण्यावर मी माझा आणि रेश्माचा एक फोटो टाकला होता. हा फोटो आमचा ऑफस्क्रीन काढलेला होता. तो फोटो चाहूल मालिकेच्या वेळचा होता. त्या फोटोनंतर आमच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. मला एका पेट्रोल पंपावरही एकाने विचारलं होतं की, तू आणि रेश्मा रिलेशनशीपमध्ये आहात का? पण, रेश्मा ही माझी फक्त चांगली मैत्रीण आहे. माझी पहिली मालिका बंध रेशमाचे तेव्हापासून तिचं आणि माझं नातं आहे."

दरम्यान, रेश्माने 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावरही ती कमालीची सक्रीय आहे. तर, अक्षय सध्या स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत काम करत आहे.

Web Title: marathi actor akshar-kothari-said-the-truth-behind-rumors-of-his-relationship-with-reshma-shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.