"हा माज मी कमावला आहे", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "मी मरेपर्यंत माझ्यासोबत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 02:38 PM2023-10-19T14:38:03+5:302023-10-19T14:38:55+5:30
"वयाच्या २८व्या वर्षी हायकोर्ट गाजवणारा आणि आत्तापर्यंत एकही केस न हरलेला मी...', मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
मराठी अभिनेता अक्षय वाघमारेने अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत अक्षय पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो. अक्षय सोनी वाहिनीवरील 'प्रतिशोध : झुंज अस्तित्वाची' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. या मालिकेत तो शंतनू वर्दे हे वकिलाचं पात्र साकारत होता. पण, आता या मालिकेतून त्याने एक्झिट घेतली आहे.
अक्षय वाघमारेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन मालिकेच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. मालिकेचा शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा हा फोटो शेअर करत अक्षयने भावुक पोस्ट लिहिली आहे.
“शंतनू वर्दे” रजा घेतोय…
कॅम्पस क्लबमधून गेल्या वर्षी एक फोन आला होता. नवीन मालिका सुरु करणार आहोत. तुला त्यात मुख्य भूमिका करायला आवडेल का? मालिकेचं नाव अजून ठरलं नाही हे सांगण्यात आलं होतं. वेळ न घालवता माझं उत्तर होतं “हो”...ऑडिशन झाली, मी सिलेक्ट झालो आणि काही दिवसांनी मालिकेला नाव मिळालं...“ प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची"
ज्या दिवशी या मालिकेसाठी माझी निवड झाली तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता.
सर्वप्रथम मी सोनी मराठी आणि सोहा कुलकर्णीचे आभार मानतो की त्यांनी इतका भन्नाट आणि मालिका विश्वात आजपर्यंत कधीही न आलेला विषय लोकांसमोर आणला.शंतनू वर्दे हे पात्र मला साकारायला मिळालं. खरं सांगू ? या क्षणी काय बोलतात किंवा काय बोलावं हे कळत नाहीये कारण उद्यापासून गोरेगाव ते मढ हा प्रवास 'प्रतिशोध'साठी नसेल याचा विचार करताना सुद्धा कसंतरी होतंय. एक कनेक्शन झालंय या पात्राशी. या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांशी. त्यामुळे मनातून इथून बाहेर पडणं त्रासदायक आहे. २ दिवसांपूर्वी सेटवर माझा शेवटचा दिवस होता. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. माझा पाय निघत नव्हता सेट वरून…पण एकीकडून निघालो तरंच दुसरीकडे पोहचता येतं असा विचार केला आणि निघालो. माझ्यासाठी ही मालिका खूप जवळची आहे. यात काम करणाऱ्या कलाकारांसोबत घट्ट मैत्री कधी झाली कळलं नाही. काही जण तर जिवाभावाचे झाले. हे सगळे सोबत असतीलच आयुष्यभर. शेवटी एवढंच म्हणेन तेही शेवटचं...
“हो मीच , Advocate शंतनू वर्दे . वयाच्या २८ व्या वर्षी हायकोर्ट गाजवणारा आणि आत्तापर्यंत एकही केस न हरलेला मी वकील आहे...माझा हा जो माज आहे ना तो मी कमावलाय आणि मी मरेपर्यंत तो माझ्या सोबत असेल.”
Thank you so much for everything
लवकरच परत भेतूयात
लवकरच पुन्हा काम करूयात
अक्षयने 'प्रतिशोध : झुंज अस्तित्वाची' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अक्षय लवकरच 'खुर्ची' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.