"पुस्तकातून अनेकदा इतिहास वाचला पण...", 'छावा' पाहून लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:39 IST2025-02-19T10:37:37+5:302025-02-19T10:39:16+5:30

'छावा' पाहून लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली- "माझ्या राजासाठी..."

marathi actor anshuman vichare wife praised vicky kaushal and chhaava director laxman utekar shared post on social media | "पुस्तकातून अनेकदा इतिहास वाचला पण...", 'छावा' पाहून लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट

"पुस्तकातून अनेकदा इतिहास वाचला पण...", 'छावा' पाहून लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट

Chhava Cinema: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमा बॉक्स धुमाकूळ घालतो आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. 'छावा' सिनेमात विकी कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) तसेच अक्षय खन्ना, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, संतोष जुवेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटासह त्यातील कलाकारांचं प्रत्येकजण कौतुक करत आहेत. बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी देखील छावाचं कौतुक करत प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे. दरम्यान, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी आणि अभिजीत चव्हाण या कलाकारांनंतर अभिनेता अंशुमन विचारेनेसोशल मीडियावर पोस्ट शेअर करत छावाचं कौतुक केलं आहे. त्यानंतर आता अंशुमन विचारेच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे छावा सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारेने सोशल मीडियावर 'छावा' सिनेमाबद्दल खास पोस्ट करत तोंडभरुन कौतुक केलं आहे. अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, "काल छावा पाहून आलो, रात्रभर मी झोपूच शकले नाही डोळे बंद केले की शेवटच्या क्षणी महाराजांना दिलेल्या असह्य जखमा डोळ्यासमोर यायच्या आणि खाडकण डोळे उघडायचे, महाराजांना पकडल्या क्षणापासून मी तोंडावर रुमाल दाबून अक्षरशः हमसून हमसून रडत होते, पुस्तकातून अनेकदा इतिहास वाचला आहे आणि रडले सुद्धा आहे. पण 'छावा' चित्रपट मला थेट तिथे घेऊनच गेला अस वाटल हे सगळं होत असताना मी तिथेच आहे जीव पेटून उठत होता पण मी माझ्या राजासाठी फक्त रडू शकत होते हतबल होऊन बाकी काहीच करू शकत नव्हते ,राहून राहून एकच वाटत होतं महाराजांनी हे सगळं कसं सहन केलं असेल, अंशू मी आणि चक्क अन्वी सुद्धा आम्ही तिघेही रडत होतो."

पुढे तिने लिहीलंय, "खूप वर्षांनी अशी कलाकृती पाहिली आपल्या इतिहासावर असे अनेक चित्रपट यावेत आणि आपल्या मुलाना त्याचं गांभीर्य कळावं. विकी कौशल तुम्ही कमाल काम केलयं, शरीर तुमचं होतं पण तुमच्या शरीरात आत्मा माझ्या महाराजांची होती..., लक्ष्मण उतेकर सर, कमाल दिग्दर्शन तुम्हाला माझ्याकडून मानाचा मुजरा...!" अशी पोस्ट पल्लवी विचारेने शेअर केली आहे.

Web Title: marathi actor anshuman vichare wife praised vicky kaushal and chhaava director laxman utekar shared post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.