भरत जाधवची 'ही' गाजलेली मालिका आठवते का? फोटोतील किती कलाकारांना तुम्ही ओळखलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 18:26 IST2023-07-28T18:24:56+5:302023-07-28T18:26:15+5:30
Bharat jadhav:१९९९ साली सुरु झालेली ही मालिका जवळपास ३ वर्ष चालली. आता ही मालिका संपून २१ वर्ष झाले आहेत.

भरत जाधवची 'ही' गाजलेली मालिका आठवते का? फोटोतील किती कलाकारांना तुम्ही ओळखलं?
मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात नाटकापासून किंवा मालिकांपासून केली. मात्र, तेच कलाकार आज रुपेरी पडदा गाजवत आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे भरत जाधव (bharat jadhav). नाटक, मालिका, एकांकिका आणि सिनेमा अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर भरत जाधवचा वावर असल्याचं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे उत्तम अभिनयामुळे त्यांचा मोठा चाहतावर्गदेखील आहे. त्यामुळे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांशी जोडण्याचा प्रयत्न करतात.
भरत जाधव बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांच्या करिअरमधील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात काही वेळा ते जुने फोटो शेअर करत जुन्या आठवणींनाही उजाळा देतात. यावेळी त्यांनी एका मालिकेतील फोटो शेअर केला आहे.
छोट्या पडद्यावर गाजलेली प्रपंच मालिका अनेकांना आठवत असेल. १९९९ साली सुरु झालेली ही मालिका जवळपास ३ वर्ष चालली. आता ही मालिका संपून २१ वर्ष झाले आहेत. मात्र, तिची लोकप्रियता आजही कायम आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार झलकले होते.
या कलाकार मंडळींनी गाजवली मालिका
भरत जाधवने शेअर केलेला फोटो प्रपंच मालिकेच्या सेटवरचा आहे. या फोटोमध्ये मालिकेत झळकलेले कलाकार एकत्र दिसून येत आहेत. यात सुधीर जोशी, प्रेमा साखरदंडे, संजय मोने, सुहास जोशी, बाळ कर्वे, अमिता खोपकर, रसिका जोशी, भरत जाधव, सुनील बर्वे, भार्गवी चिरमुले, शर्वरी पाटणकर, सोनाली पंडित आणि आनंद इंगळे हे कलाकार झळकले होते.