"आज, उद्या आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम...",'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची होणाऱ्या पत्नीसाठी रोमॅंटिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:05 IST2024-12-10T12:02:07+5:302024-12-10T12:05:11+5:30
छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका प्रसारित होत असतात. परंतु त्यातील काही मोजक्याच असतात ज्या प्रेक्षकांच्या मनात घर करतात.

"आज, उद्या आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम...",'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची होणाऱ्या पत्नीसाठी रोमॅंटिक पोस्ट
Kiran Gaikwad: छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका प्रसारित होत असतात. परंतु त्यातील काही मोजक्याच असतात ज्या प्रेक्षकांच्या मनात घर करतात. त्यामधील एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं ती मालिका म्हणजे 'देवमाणूस'. झी मराठीवरील 'देवमाणूस' ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेप्रमाणे त्यातील पात्रांनीही प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. या मालिकेच्या कथानकाचं प्रचंड कौतुक व्हायचं. त्यानंतर मालिकेचा दुसरा भागही प्रेक्षकांना आवडला. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड )(Kiran Gaikwad) डॉ.अजितकुमार चंद्रकांत देव म्हणजेच देविसिंगच्या भूमिकेत पाहायला मिळाला. किरण साकारलेल्या देविसिंगच्या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. दरम्यान, आता लवकर किरण गायकवाड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने लग्नाची तारीखही जाहीर केली.
दरम्यान, नुकतीच किरण गायकवाडने सोशल मीडियावर वैष्णवीसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. "आज, उद्या आणि आयुष्यभर मी तुझ्यावरच प्रेम करणार..." फोटोंना असं कॅप्शन देत त्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दोघांमधील खास क्षण पाहायला मिळत आहेत. शिवाय त्यांच्या रोमॅंटिक फोटोला मराठी कलाकार मंडळींसह चाहत्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेता किरण गायकवाडने काही दिवसांपूर्वीच म्हणजेच २९ नोव्हेंबरच्या दिवशी सोशल मीडियावर वैष्णवी कल्याणकर आणि त्याचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. किरण गायकवाडने वैष्णवीसोबतचा खास फोटो शेअर करुन कॅप्शन लिहिलं की, "तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर!" याशिवाय #SheSaidYes #ForeverYours #NewBeginnings असे हॅशटॅग वापरुन किरणने प्रेमाची कबुली दिलीय. अशी सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत किरणने चाहत्यांना सुखद धक्काच दिला. तेव्हापासून किरण आणि वैष्णवी ही नवी जोडी चर्चेत आली आहे.