'२६ वर्ष झाली पण हा सिनेमा आजही..'; गौरव मोरेची 'सत्या' विषयी खास पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 05:11 PM2024-07-04T17:11:37+5:302024-07-04T17:11:55+5:30

गौरव मोरेने राम गोपाल वर्मांच्या 'सत्या' सिनेमाविषयी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (gaurav more, satya)

marathi actor Gaurav More special post about Satya movie completed 26 years bhiku mhatre | '२६ वर्ष झाली पण हा सिनेमा आजही..'; गौरव मोरेची 'सत्या' विषयी खास पोस्ट चर्चेत

'२६ वर्ष झाली पण हा सिनेमा आजही..'; गौरव मोरेची 'सत्या' विषयी खास पोस्ट चर्चेत

राम गोपाल वर्मांचा 'सत्या' सिनेमा आजही अनेकांचा फेव्हरेट सिनेमा असेल यात शंका नाही. मुंबई अंडरवर्ल्डमधील एक हळवी आणि प्रेमळ बाजू 'सत्या' सिनेमाने प्रेक्षकांसमोर आणली. मनोज वाजपेयी, सौरभ शुक्ला, मकरंद देशपांडे अशा अनेक कलाकारांनी करिअरच्या सुरुवातीला 'सत्या'सारख्या सिनेमात जबरदस्त अभिनय केल्याने या सर्व कलाकारांना करिअरची दारं खुली झाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेही सत्या विषयी एक खास पोस्ट लिहिली आहे. 

गौरव मोरेने 'सत्या'मधील भिकू म्हात्रे आणि सत्या यांचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "दम हैं ,दम हैं ,इसमें… भिकु नाम हैं मेरा,भिकु बोलाना…..सत्या
माझी सगळ्यात आवडती फिल्म. भिकू म्हात्रे आणि सत्या ह्यांची मैत्री २६ वर्ष झाली पण हा सिनेमा आजही तितकाच ताजा आहे..एक एक फ्रेम,गाणी,पात्र,ह्या सिनेमातला पाऊससुद्धा भारी आहे आणि ह्याच बॅकग्राउंड म्यूजिक क्या बात है भाई. मुंबई इतक्या सुंदररित्या सिनेमामधे मी आजपर्यंत पाहिली नाही. मी फक्त एक सांगेन बाहेर मस्त पाऊस सुरू झाला की सत्या नक्की बघा पाऊस आणि सत्या एक वेगळच समिकरण आहे."



गौरव मोरे पुढे लिहितो, "मुंबई का किंग कोन भिकू म्हात्रे.. अरे मामु अपना भिकु हैं वोह उसको जिधर भी डालो उधर का जगह उसको रास होता हैं .शब्बों को ट्राय किया क्या किचड़ा में भी कमल खिलते हैं। भिकु तू अपुन का धंदा नहीं जानता एक गया अपूने के धंदे में तो सब जाएगा । असे अनेक डायलॉग आहेत जे आपण कधीच विसरू नाही शकत निदान मी तरी" अशाप्रकारे गौरवने 'सत्या'विषयी पोस्ट लिहून तो त्याचा आवडता सिनेमा असल्याचा खुलासा केलाय. 

Web Title: marathi actor Gaurav More special post about Satya movie completed 26 years bhiku mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.