कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अहिंसावादी माणूस! किरण माने दिसणार 'या' नव्या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:31 IST2024-10-10T16:30:52+5:302024-10-10T16:31:45+5:30
किरण मानेंच्या नवीन मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (kiran mane)

कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अहिंसावादी माणूस! किरण माने दिसणार 'या' नव्या मालिकेत
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे किरण माने.किरण मानेंना आपण आजवर विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. किरण माने यांनी नाटक, सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्येही किरण माने सहभागी होते. या सीझनमध्ये किरण माने यांनी टॉप ५ पर्यंत मजल मारली होती. अशातच किरण माने एका नव्या मालिकेत दिसणार आहेत. याविषयी त्यांनी माहिती दिली.
या नव्या मालिकेत दिसणार किरण माने
किरण माने कलर्स मराठीवरील 'लय आवडतेस तू मला' या मालिकेत झळकणार आहेत. साखरकारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कासाठी अहिंसेच्या जोरावर लढणारे अप्पा धुमाळ येत या भूमिकेत किरण माने आपल्याला दिसणार आहेत. किरण मानेंनी स्वतः याविषयीचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्या नव्या मालिकेविषयी सर्वांना सांगितलं. किरण मानेंना पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहायला त्यांचे चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.
लय आवडतेस तू मला मालिकेविषयी
काही दिवसांपूर्वीच 'लय आवडतेस तू मला' या मालिकेची पहिली झलक समोर आली असून प्रेक्षकांना आता मालिकेची उत्सुकता आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'लय आवडतेस तू मला!'ही मालिका १४ ऑक्टोबरपासून रात्री ९:३० वाजता 'कलर्स मराठी'वर बघायला मिळणार आहे. गावच्या मातीत फुलणारी हळुवार प्रेमाची गोष्ट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.