किरण माने यांच्या वडिलांचं निधन, काही वर्षांपूर्वी झालेला स्मृतीभ्रंश; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 17:30 IST2025-03-30T17:29:42+5:302025-03-30T17:30:11+5:30
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

किरण माने यांच्या वडिलांचं निधन, काही वर्षांपूर्वी झालेला स्मृतीभ्रंश; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाटक, मालिकांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. दिनकरराव माने असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज संध्याकाळीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले, "माझे नातेवाईक,मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या माहितीसाठी…माझे वडील दिनकरराव मारुती माने यांचे आज सातारा येथे राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी ६ वाजता संगम माहुली, सातारा येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत." या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वडिलांना झाल होता डिमेन्शिया
माने यांच्या वडिलांना डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश झाला होता. एका मुलाखतीत किरण माने म्हणाले होते की, "आपल्याला मुलासाठी बघितलेली सर्व स्वप्न आज पूर्ण होत आहेत तरी तुम्ही समोर असूनही तुम्हाला ती अनुभवता येत नाहीत. कारण तुम्हाला काहीच आठवत नाहीये."