३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:15 IST2025-01-13T18:15:03+5:302025-01-13T18:15:20+5:30

'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेला आज ३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

marathi actor kiran mane shared post said 3 years completed when i exit from mulgi zali ho show | ३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट

३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट

किरण माने हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'पिंपळपान', 'भेटी लागी जीवा', 'सिंधुताई माझी माई', तिकळी या मालिकांमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. तर  'मुलगी झाली हो' या मालिकेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. पण, या मालिकेतील भूमिकेपेक्षा जास्त ते कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत होते. 'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेला आज ३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

किरण मानेंची पोस्ट 

बोललो ते करून दाखवलं भावांनो !
आज बरोबर तीन वर्ष झाली! माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. कुठलीही चूक नसताना मला सिरियलमधून काढून टाकलं होतं. त्यावेळी मी मोठ्या आत्मविश्वासाने ही पोस्ट केली होती.

ट्रोल्सनी थयथयाट केला होता. ‘किरण माने संपला’ , ‘रस्त्यावर आला’, ‘आता त्याला कोण काम देणार?’, ‘आमच्याशी पंगा घेणाऱ्यांना आम्ही असेच संपवू’ अशी गरळ ओकली होती…
त्यावेळी तुम्ही भावाबहिणींनी मला भरभरून सपोर्ट केलावता.

आज मला तुम्ही ‘सर आँखो पे’ ठेवलं आहे. या तीन वर्षात मी करिअरमधलं सगळ्यात जास्त काम केलं! तीन सिरियल्स, बिग बॉस, सात सिनेमे... महाराष्ट्रभर शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि बुद्धविचारांचा प्रसार. एवढंच नाही तर राजकीय मंचही गाजवला. हे सगळं अजूनही नॉन स्टॉप सुरू आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बिग बॉस मधून आल्यावर साताऱ्यात माझी भव्य मिरवणूक निघाली होती. 

आजच्याच दिवशी ज्या वेळी मला सिरीयलमधून काढून टाकल्याचा फोन आला होता, त्याच टायमिंगला म्हणजे बरोबर ७.३० वाजता आज माझं फ्लाइट आहे. एका मोठ्या कंपनीच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी मी ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून चाललो आहे !

तीन वर्षांत मी करिअरचा आनंदसोहळा साजरा करतोय. तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करताय. पण, त्यावेळी मला विरोध करणारेसुद्धा अनेकजण माझे फॅन झालेत. कौतुकाची, मायेची बरसात करतायत ! परवाच पुण्यातल्या एक लेखिका आशा नेगी भेटल्या, म्हणाल्या, “तीन वर्षांपूर्वी जेव्हा तुमच्यावर आरोप होत होते. तेव्हा माझे तुमच्याविषयी वाईट मत झाले होते. या तीन वर्षातला तुमचा प्रवास पाहून, तुमचे विचार वाचून, भाषणं ऐकून मी तुमची डाय हार्ड फॅन झाले आहे”. माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. मला काळजापासून जीव लावणाऱ्या लाखो भावाबहिणींचे लै आभार.

मी तुमच्या घरातलं एक लेकरू हाय. तुकोबारायांच्या "बोले तैसा चाले" या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल करतोय. मराठमोळा अभिनेता म्हणून तुम्हाला कायम अभिमान वाटेल असंच काम माझ्या हाताने होत राहील, हे वचन देतो. लब्यू ❤️


किरण मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Web Title: marathi actor kiran mane shared post said 3 years completed when i exit from mulgi zali ho show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.